mr_tn/ROM/01/01.md

2.7 KiB
Raw Blame History

पौल

‘’पौलाकडून. एका पत्राच्या लेखकाची ओळख करून देण्याची तुमच्या भाषेत वेगळी पद्धत असेल. ह्याचे भाषांतर ‘’मी, पौल, ह्याने हे पत्र लिहिले. हे पत्र कोणाला लिहण्यात आले हे देखील तुम्हाला सांगण्याची गरज आहे (१:७, पहा युडीबी).

प्रेषित होण्याकरिता बोलाविण्यात आलेला, देवाच्या सुवार्तेसाठी वेगळा करण्यात आलेला

एक नवीन वाक्य आणि कर्तरी क्रियापदांनी ह्याचे भाषांतर करता येते: ‘’देवाने मला प्रेषित म्हणून बोलवले आणि शुभवर्तमानाच्या बद्दल सांगण्यास निवडले. (पहा: कर्तरी किंवा कर्मणी)

पवित्र शास्त्रात आपल्या संदेष्ट्यांच्या द्वारे पूर्वीच वचन दिले

देवाने आपले राज्य प्रस्थापित केले असे वचन त्याने आपल्या लोकांना दिले. त्याने संदेष्ट्यांना ही वचने शास्त्रवचनात लिहिण्यास सांगितली.

त्याचा पुत्र येशू ह्याच्याविषयी

ह्याचा संदर्भ ‘’देवाचे शुभवर्तमान, ह्याच्याशी आहे, ती सुवार्ता की देव त्याचा पुत्र ह्या जगात पाठवणार होता.

जो देहदृष्ट्या दाविदाच्या वंशात जन्मास आला

येथे ‘’देहदृष्टया’’ ह्या शब्दाचा संदर्भ शरीराशी आहे. ह्याचे भाषांतर ‘’शारीरिक स्वरूपाच्या नुसार जो दाविदाचा वंशज आहे’’ किंवा ‘’ज्याचा जन्म दाविदाच्या कुटुंबात झाला.