mr_tn/MAT/10/26.md

22 lines
3.1 KiB
Markdown

येशूने १०:१६ मध्ये त्याच्या प्रेषिताना त्याच्यासाठी पुढे येणारा छळ सहन करावा लागेल हे सांगण्याचे सुरु केले होते ते तो चालू ठेवतो.
# त्यांना भिऊ नका
"त्यांना" हे सर्वनाम जे लोक येशूच्या अनुयायांना वाईट वागणूक देतात त्यांचा उल्लेख करतो.
# उघडकीस येणार नाही असे कांही झांकलेले नाही आणि कळणार नाही असे कांही गुप्त नाही
ह्या समांतरवादाचे असेहि भाषांतर केले जाऊ शकते "लोकांनी जे झांकलेले आहे ते देव उघडकीस आणील" (पाहा: समांतरवाद आणि कर्तरी किंवा कर्मणी)
# जे मी तुम्हांस अंधारांत सांगतो ते उजेडांत बोला आणि तुमच्या कानांत सांगितलेले जे तुम्ही ऐकतां ते धाब्यावरून घोषित करा
ह्या समांतरवादाचे देखील असे भाषांतर होऊ शकते "जे मी तुम्हांला अंधारांत सांगतो ते लोकांना तुम्ही उजेडांत सांगा आणि तुम्ही कानांत जे हळुवारपणे ऐकले ते धाब्यावरून घोषित करा."
# जे मी तुम्हांला अंधारांत सांगतो
"मी तुम्हांला जे गुप्तपणे सांगतो" (यु डी बी ) किंवा "ज्या गोष्टी मी तुम्हांला एकांतात सांगतो" (पाहा: रूपक)
# उजेडांत सांगा
"उघडपणे सांगा" किंवा "सार्वजनिकपणे सांगा" (यु डी बी ) (पाहा: रूपक)
# जे तुम्ही हळुवारपणे तुमच्या कानांत ऐकता
"मी जे तुम्हांला हळू आवाजांत सांगतो."
# धाब्यावरून घोषित करा
"सर्वांना ऐकू जाईल अशा मोठ्या आवाजांत बोला" किंवा." जेथे येशू राहत होता त्या घरावर गच्ची होती, आणि जे कोणी मोठ्या आवाजांत बोलत होते ते त्यांना दूरवर ऐकू जात असे.