mr_tn/MAT/08/01.md

22 lines
2.8 KiB
Markdown

येशू चमत्कारिकरित्या अनेक लोकांना बरे करतो त्या अहवालाची ही सुरूवात आहे.
# येशू जेव्हा डोंगरावरून खाली आला तेव्हा लोकांचे थवे त्याच्या मागे चालले
पर्यायी भाषांतर: "येशू डोंगरावरून खाली आल्यावर, लोकांचे थवे त्याच्या मागे चालले." जे डोंगरावर येशू बरोबर होते व जे येशुबरोबर नव्हते ह्या दोन्ही प्रकारच्या लोकांचा जमावामध्ये समावेश असू शकतो.
# पाहा
"पाहा" हा शब्द आपल्याला कथेमधील एका नवीन व्यक्तीची सूचना देतो. तुमच्या भाषेत हे करण्याचा मार्ग असावा.
# कुष्ठरोगी
"ज्याला कुष्ठरोग आहे तो मनुष्य" किंवा "चर्मरोग झालेला मनुष्य" (यु डी बी )
# तुझी इच्छा असली तर
पर्यायी भाषांतर: "जर तुला करावेसे वाटले तर" किंवा "जर तुझी इच्छा असली तर." त्या कुष्ठरोग्यास हे ठाऊक होते की त्याला बरे करण्याचे येशूला सामर्थ्य आहे, परंतु त्याला हे ठाऊक नव्हते की त्याला स्पर्श करण्याची येशूची इच्छा होती किंवा नाही.
# तुम्ही मला शुद्ध करू शकता
पर्यायी भाषांतर: "तुम्ही मला बरे करू शकता" किंवा "कृपया मला बरे करा" (यु डी बी )
# लागलेच
"ताबडतोब"
# त्याचे कुष्ठ जाऊन तो शुद्ध झाला
"शुद्ध हो" असे येशूच्या शब्दाने परिणामत: तो मनुष्य बारा झाला. पर्यायी भाषांतर: "तो बरा होता" किंवा "त्याचे कुष्ठ गेले" किंवा "कुष्ठरोगाचा अंत झाला."