mr_tn/MAT/05/31.md

3.0 KiB

येशू त्याच्या शिष्यांना शिकविण्याचे पुढे चालू ठेवतो. ह्या घटनेची सुरूवात ५:१ मध्ये झाली.

हे सांगितले...होते

देवानेच हे "सांगितले" होते (पाहा: यु डी बी ). येशू येथे कर्मणी प्रयोगाचा उपयोग करीत आहे हे स्पष्ट करण्यासाठी की देव किंवा देवाचे वचन त्याच्याशी असहमत होते असे नाही, तर त्या ऐवजी तो असे म्हणतो की, उचित कारणासाठी घटस्फोट दिला तर तो न्याय आहे. माणसाने जरी आज्ञेचे पालन करून लेखी सूचना दिली तरी घटस्फोट हा अन्यायकारक असू शकतो.पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)

आपल्या बायकोला टाकले

घटस्फोटासाठी ही शिष्टोक्ति आहे (पाहा: शिष्टोक्ति)

त्याने तिला द्यावे

ही आज्ञा आहे; "त्याने दिलेच पाहिजे"

परंतु मी तुम्हांला सांगतो

येशू येथे हे सूचित करू इच्छित होता की "जे कांही सांगितले गेले होते" त्यापेक्षा तो कांही वेगळे सांगणार होता. "मी" वर जास्त जोर दिला गेला आहे कारण ज्याने "सांगितले होते" त्यापेक्षा तो जास्त महत्वाचा होता असा त्याचा दावा होता.

तो तिला व्यभिचारिणी करतो

पुरूषच केवळ तिला अनुचित प्रकारे घटस्फोट देतो आणि "तिला व्यभिचार करण्यास प्रवृत्त करतो." (तुम्ही ५:२७ मध्ये "व्यभिचार करण्यांस" ह्यासाठी ज्या शब्दांचा उपयोग केला तेच शब्द वापरा). अनेक संस्कृतीं मध्ये तिने परत लग्न करणे ही सामन्य गोष्ट असते, परंतु जर घटस्फोट हा अनुचित असेल तर तो पुनर्विवाह व्यभिचार आहे (पाहा यु डी बी )