mr_tn/ROM/13/03.md

2.8 KiB
Raw Blame History

कारण

पौल १३:२ चे स्पष्टीकरण देतो आणि शासन जर एखाद्या व्यक्तीवर दोष लावेल तर काय घडेल ह्याचे स्पष्टीकरण देतो.

अधिकाऱ्यांची भीती नसते

अधिकारी चागल्या लोकांना घाबरवत नाही.

चांगल्या कामाला...वाईट कामाला

लोकांची ओळख त्यांच्या ‘’चांगल्या कृत्यांनी’’ किंवा ‘’वाईट कृत्यांनी होते. (पहा: अजहल्लक्षण अलंकार)

अधिकाराची भीती नसावी अशी तुझी इच्छा असल्यास?

पर्यायी भाषांतर: ‘’मला तुम्हाला शासनाची कशी भीती बाळगू नये हे सांगू द्या. (पहा: अभिप्रेत प्रश्न)

त्याच्याकडून तुझी प्रशंसा होईल

जे लोक चांगले करतात त्यांच्याबद्दल शासन चांगल्या गोष्टी बोलून दाखवते.

तो तरवार व्यर्थ धारण करत नाही

‘’त्याला लोकांना शिक्षा देण्याचे सामर्थ्य असते, आणि तो लोकांना शिक्षा देतो’’ (परिणामी नकारात्मक विधान)

तरवार धारण करणे

रोमी शिपाई त्यांचा अधिकार दर्शवण्यासाठी चिन्ह म्हणून एक छोटी तरवार धारण करतात. (पहा: अजहल्लक्षण अलंकार)

सूड घेणारा

‘’दुष्टाई च्या विरुद्ध शासनाचा क्रोध म्हणून जी व्यक्ती लोकांना शासन करते’’ (पहा: पद्न्युन्ता)

म्हणून क्रोधामुळे नव्हे, तर सद्सद्विवेकबुद्धीमुळेही

‘’शासन तुम्हाला शिक्षा देईलच असे नाही, तर देवाच्या समोर देखील तुमचा विवेक स्पष्ट असेल’’