mr_tn/2CO/03/01.md

3.5 KiB

आम्ही पुन्हा आमची वाखाणणी करू लागलो आहो काय?

ते जे आहेत त्यापेक्षा ते चांगले वाटावे म्हणून प्रयत्न करीत नाहीत हे व्यक्त करण्यासाठी पौल असे म्हणत आहे. (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)

कित्येकांस लागतात तशी आम्हांला तुम्हांसाठी किंवा तुमच्यापासून शिफारसपत्रांची आवश्यकता नाही, आम्हांस पाहिजे काय?

पौल आणि तीमथीच्या चांगल्या प्रतिष्ठेबद्दल करिंथकरांना चांगले ठाऊक होते हे व्यक्त करण्यासाठी पौल असे म्हणत आहे (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)

शिफारस पत्र

करिंथ येथील मंडळीच्या लोकांप्रती पौल आणि तीमथीच्या प्रेमाची तुलना त्या शिफारस पत्रांशी केली गेली आहे जी असे दाखवतात की पौल आणि तीमथीवर विश्वास ठेवला जाऊ शकतो. (पाहा: रूपक)

मानवांच्या अंत:करणरुपी पाट्यांवर....जिवंत देवाच्या आत्म्याच्या द्वारे लिहिलेले....आमच्या द्वारे वितरीत केलेले...असे तुम्ही ख्रिस्ताचे पत्र आहा

करिंथ येथील मंडळीतील लोक हे पत्रासारखे आहेत आणि पौल आणि तीमथी ह्यांनी येशू ख्रिस्ताचा जो संदेश सांगितला त्यामध्ये पवित्र आत्म्याच्या द्वारे त्यांच्या सारख्या लोकांना बदलविण्याचे सामर्थ्य आहे अशी ते साक्ष देतात. (पाहा: रूपक)

दगडी पाट्यांवर नव्हे तर, मनुष्यांच्या अंत:करणरुपी पाट्यांवर

"दगड" हा शब्द जे कधीहि बदलू शकत नाही अशा गोष्टींचा उल्लेख करते. "मानवी अंत:करणे" ह्या वाक्यांशाचा येथे उपयोग केले गेला आहे कारण ते नरम असून ते व्यक्तीच्या बदलण्याच्या क्षमतेचा उल्लेख करतात. (पाहा: वाक्प्रचार)

पाट्यां

ह्या दगडाच्या किंवा मातीच्या चपट्यां आणि सपाट पाट्यां ज्यांचा लिहिण्यासाठी उपयोग केला जात असे.