mr_tn/MAT/23/23.md

2.3 KiB

धार्मिक पुढाऱ्याच्या ढोंगीपणाबद्दल येशू त्यांच्या विरुद्ध बोलण्याचे सुरू करतो.

तुमची केवढी दुर्दशा होणार

२३:१३ मध्ये तुम्ही ह्याचे कसे भाषांतर केले आहे ते पाहा.

पुदिना, बडीशेप व जिरे

जेवणाला चांगला स्वाद येण्यासाठी पाने व बियांचा उपयोग करतात (पाहा: अपरिचीतांचे भाषांतर)

अहो आंधळ्या वाटाड्यांनो

हे लोक शारीरिकरित्या आंधळे नाहीत येशू आध्यात्मिक आंधळेपणाची शारीरिक आंधळेपणाशी तुलना करीत आहे. (पाहा: रूपक)

तुम्ही मुरकूट गाळून काढता आणि उंट गिळून टाकता

कमी महत्वाचे नियम पाळता आणि अधिक महत्वाचे नियम टाळता हे तितकेच मूर्खपणाचे आहे की सर्वांत लहान अशुद्ध प्राण्याला गिळण्याचे टाळता परंतु मुद्दाम किंवा नकळत मोठ्या अशुद्ध प्राण्याचे मांस खाता. AT: "तुम्ही त्या व्यक्ती इतकेच मूर्ख आहा जो त्याच्या पेयांत पडलेल्या मुरकुट गाळतो परंतु उंटाला गिळून टाकतो." (पाहा: रूपक आणि अतिशयोक्ती अलंकार)

मुरकुट गाळतो

कपड्याने गाळून प्याल्याने मच्छरास तोंडांत जाऊ देत नाही.

मच्छर

एक लहान उडणारे कीटक.