mr_tn/PHP/02/17.md

2.4 KiB
Raw Permalink Blame History

तुमच्या विश्वासाचा यज्ञ व सेवा होताना जरी मी स्वतः अर्पिला जात आहे, तरी मी त्याबद्दल आनंद मानतो व तुम्हा सर्वांबरोबर आनंद करितो

पौल त्याच्या मृत्यूची तुलना जुन्या करार्तील परंपरेशी करत आहे जिथे द्राक्षरस किंवा जैतून तेल हे पशु यज्ञाच्या वर किंवा बाजूला ओतले जात असे आणि ते अर्पण आराधक देवाला अर्पण करत असे. ह्यातून पौलाचे अर्थ म्हणजे तो आनंदाने फिलिप्पै येथील लोकांसाठी मरेल जर त्याने ते देवासाठी अधिक संतोषकारक बनत असतील. आणि, ‘’अर्पिला जात असे’’ हे कर्मणी प्रयोगात आहे. एक कर्तरी पोटवाक्य म्हणून ह्याचे भाषांतर करता येते: ‘’पण, जर रोमी लोकांनी माझा शिरच्छेद करायचे ठरवले तर, माझ्या मृत्यूने तुमचा विश्वास आणि आज्ञापालन जर देवाला अधिक संतोषकारक असे करेल तर ह्याने मी अधिक आनंदी होईल. (पहा: रूपक अलंकार आणि कर्तरी किंवा कर्मणी)

आणि त्याचाच

‘’तसेच’’

तुम्हीही आनंद माना व माझ्याबरोबर आनंद करा

हा वाक्यांश ‘’आनंदात आनंद माना’’ हा भर देण्यासाठी वापरला गेले आहे. ह्याचे भाषांतर ‘’तुम्ही माझ्याबरोबर खूप अधिक आनंद करा अशी माझी इच्छा आहे.