mr_tn/JAS/02/01.md

3.0 KiB

माझ्या बंधूंनो

याकोब त्याच्या श्रोत्यांना यहूदी विश्वासणारे समजतो.याचे भाषांतर असे होऊ शकेल”माझ्या सहकारी विश्वासणाऱ्यांनो” किंवा “ख्रिस्तात असलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो”

तुम्ही आपल्या प्रभूवर विश्वास ठेवा

“आपला” ह्या शब्दामध्यें याकोब व त्याच्या विश्वासणाऱ्यांचा समावेश आहे.

काही विशिष्ट लोकांना अधिक महत्व देऊन

“त्यांना विशेष वागणूक” किंवा “त्यांच्याशी चांगले वागून” किंवा “त्यांना अधिक आदरयुक्त वागणूक देऊन”

जर काही लोक

याकोब ह्या परिस्थीतीविषयी एक समज करतो जो वचनाच्या शेवटापर्यत आहे. ४.तो ह्या परिस्थीतीचे वर्णन असे करतो

जें विश्वासणारे आहेत ते धनवान लोकांना दरिद्री लोकांपेक्षा अधिक आदराने वागवतात.(पहा: काल्पनिक परिस्थीतीनुरूप)

सोन्याच्या अंगठ्या घातलेले आणि उत्तम कपङे घातलेले

“श्रीमंत माणसासारखा पेहराव केलेले”

या चांगल्या जागेत बसा

“ह्या आदराच्या जागेत बसा”

तेथे उभे राहा किंवा माझ्या पायाजवळ बसा

“आदर नसलेल्या जागेकङे सरका.”

तुम्ही आपल्यामध्ये न्याय करता की नाही, आणि दुर्विचारी न्यायाधीश बनता

याकोब अलंकारयुक्त प्रश्र त्याच्या वाचकांना शिकवण्यासाठी व रागावण्यास वापरतो. त्याचे भाषांतर असे होते “तुम्ही आपल्यामध्ये न्याय करता आणि तुम्ही दुर्विचारी न्यायधीश बनता. (पहा: अलंकारयुक्त प्रश्र)