mr_tn/1TI/04/14.md

2.6 KiB
Raw Permalink Blame History

वडीलवर्ग हात ठेवण्याच्या वेळेस

ही मंडळीची एक प्रथा होती ज्यात मंडळीतील पुढारी तीमथ्यावर हात ठेवत आणि प्रार्थना करत की देवाने त्याला आज्ञा केल्याप्रमाणे काम करण्यास सहाय्य करावे.

तू स्वतःचे व ऐकणाऱ्यांचेही तारण साधशील

‘’तुम्ही स्वतःला आणि जे तुमचे ऐकतात त्यांना चुकीचे संदेश ऐकण्यापासून आणि चुकीच्या कृती करण्यापासून दूर ठेवा. जे लोक चुकीच्या संदेशावर विश्वास ठेऊन तशा कृती करतात त्यांचा परिणाम त्यांना भोगावा लागतो.

जे कृपादान तुमच्यात आहे त्याकडे दुर्लक्ष देऊ नका

‘’देवाने दिलेले वरदान वापरा’’

संदेशाच्या द्वारे

‘’जेव्हा मंडळीतील पुढारी देवाचे वचन बोलतील’’

ह्या गोष्टींचा अभ्यास ठेव व त्यात गढून जा

‘’ह्या सर्व गोष्टी करा आणि त्यानुसार जगा’’

तुझी प्रगती सर्वांना दिसून यावी

‘’जेणेकरून इतर लोक तुमची वाढ पाहतील’’ किंवा ‘’इतर लोक तुमची प्रगती पाहतील’’ किंवा ‘’इतर लोक देखील तुमची प्रगती पाहतील आणि तसे करतील’’

आपल्या शिक्षणाकडे नीट लक्ष ठेव

‘’काळजीपूर्वक तुमची वागणूक पहा’’ किंवा ‘’तुम्ही स्वतःचे वागणे नियंत्रित करा’’

त्यातच टिकून राहा

‘’ह्या गोष्टी करत राहा’’