mr_tw/bible/other/tomb.md

5.8 KiB
Raw Blame History

थडगे, कबरा, कबर, कबरी, मृताला पुरण्याची जागा

व्याख्या:

"कबर" आणि "थडगे" या शब्दांचा संदर्भ अशा जागेशी आहे, जिथे लोक मरण पावलेल्या व्यक्तीचे शरीर ठेवतात. "मृताला पुरण्याची जागा" हा अधिक सामान्य शब्द आहे, जो ह्याला संदर्भित करतो.

  • काहीवेळा यहुदी नैसर्गिक गुहांचा कबर म्हणून उपयोग करत, आणि काहीवेळा ते टेकड्यांच्या बाजूला असलेल्या दगडामध्ये गुहा खोदत असत.
  • नवीन कराराच्या काळात, एखादी कबर बंद करण्यासाठी त्याच्या तोंडाला एक मोठा, जाड दगड लोटणे हे सामान्य होते.
  • जर लक्षित भाषेमध्ये कबर या शब्दाचा संदर्भ देण्यासाठी एका चीरेचा उल्लेख येतो, जेथे जमिनीच्या खाली शरीर ठेवले जाते, तर या शब्दाचे भाषांतर करण्याच्या इतर पद्धतींमध्ये "गुहा" किंवा "टेकडीच्या बाजूला असलेले भोक" ह्यांचा समावेश होतो.
  • "थडगे" हा वाक्यांश बऱ्याचदा सामान्यपणे आणि लाक्षणिक अर्थाने मेलेल्या स्थितीला संदर्भित करण्यासाठी वापरला जातो, किंवा अशी जागा जिथे मेलेल्या लोकांचे आत्मे राहतात.

(हे सुद्धा पहा: दफन, मृत्यू)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 32:04 तो मनुष्य कबरींमध्ये रहात असे.
  • 37:06 येशूने त्यांना विचारले, ‘‘तुम्ही लाजारला कोठे ठेविले आहे? त्यांनी म्हटले ,कबरेमध्ये. या आणि पाहा.
  • 37:07 ती खडकामध्ये खोदलेली कबर होती व तिच्या दाराशी धोंडा ठेवण्यात आला होता.
  • 40:09 तेंव्हा योसेफ आणि निकदेम हे दोघे यहूदी पुढारी ज्यांनी येशू हा मशीहा आहे असा विश्वास ठेविला होता, पिलाताकडे जाऊन येशूचे शरीर मागितले. त्यांनी त्याचे शरीर वस्त्रात गुंडाळून खडकामध्ये खोदलेल्या एका कबरेमध्ये ठेवले. मग त्यांनी त्या कबरेच्या दाराशी एक मोठी धोंड उभी करुन कबरेचे दार बंद केले.
  • 41:04 त्याने कबरेच्या तोंडाशी असलेली धोंड बाजूला सारली व त्यावर बसला. तेव्हा त्या कबरेवर पहारा करत असलेल्या सैनिकांना फार भिती वाटली व ते मेल्यासारखे जमिनीवर पडले.
  • 41:05 जेव्हा त्या स्त्रिया कबरेजवळ आल्या, तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, "भिऊ नका. येशू येथे नाही. त्याने सांगितल्याप्रमाणे तो मेलेल्यातून उठला आहे! पाहा, ज्या कबरेत त्याला ठेवले होते ती जागा." तेव्हा त्या स्त्रियांनी आत जाऊन जेथे येशूचे शरीर ठेवले होते, ती जागा पाहिली. त्याचे शरीर त्या ठिकाणी नव्हते!

Strong's

  • Strong's: H1164, H1430, H6900, H6913, H7585, H7845, G86, G2750, G3418, G3419, G5028