mr_tw/bible/other/peace.md

5.6 KiB

शांती, शांतीचा, शांतपणे, सौम्य, शांती करणारे

व्याख्या:

"शांती" या शब्दाचा अर्थ असा होतो की, भावना, चिंता किंवा भय ह्याची कोणतीही स्थिती किंवा भावना नसणे. एक व्यक्ती जो "शांतीपूर्ण" आहे, त्याला शांत वाटते आणि तो शांत व सुरक्षित असण्याचे आश्वासन देतो.

  • "शांती" ह्याचा संदर्भ अशा वेळेशी आहे, जेंव्हा लोकसमूह किंवा देश एकमेकांशी लढत नसतात. हे लोक "शांततेच्या संबंधात" आहेत असे म्हंटले जाते.
  • एखाद्या व्यक्ती किंवा लोकसमूहाबरोबर "शांती बनवणे" ह्याचा अर्थ लढाई थांबवण्यासाठी कृती करणे असा होतो.
  • एक "शांती प्रस्थापित करणारा" असा आहे, जो असे करतो आणि ज्या गोष्टी सांगतो, त्या लोकांना एकमेकांशी शांततेत राहण्यास प्रभावित करतात.
  • इतर लोकांशी "शांततेत" राहणे, म्हणजे त्या लोकांविरुद्ध लढा देण्याची स्थिती नसणे.
  • देव लोकांना त्यांच्या पापांपासून वाचवितो तेव्हा देव आणि लोक यांच्यामध्ये चांगले संबंध येतात. याला "देवाबरोबर शांतीने असणे" असे म्हटले जाते.
  • "कृपा आणि शांती" हे अभिवादन प्रेषितांनी आपल्या पत्रांतील त्यांच्या सहविश्वासू बांधवांना एक आशीर्वाद म्हणून वापरले होते.
  • "शांती" या शब्दाचा अर्थ इतर लोकांशी किंवा देवासमवेत चांगला संबंध असणे देखील असू शकते.

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 15:06 देवाने इस्राएलास आज्ञा केली होती की त्यांनी कनानी लोकांबरोबर शांतीचा करार करु नये.
  • 15:12 त्यानंतर देवाने इस्राएलाच्या सर्व सीमेवर शांती प्रस्थापित केली.
  • 16:03 मग देवाने त्यांना एक तारणारा पाठविला ज्याने त्यांना शत्रूंपासून सोडविले व त्यांच्या मध्ये शांती प्रस्थापित झाली.
  • 21:13 तो सर्व लोकांच्या पापाचे प्रायश्चित्त म्हणून मरेल. त्याला मिळालेली शिक्षा मुनष्य आणि परमेश्वर यांमध्ये समेट घडवून आणिल.
  • 48:14 दाविद हा इस्राएलाचा राजा होता, परंतु येशू हा संपुर्ण विश्वाचा राजा आहे! तो पुन्हा येणार आहे व आपल्या राज्यामध्ये न्यायाने व शांतीने सर्वकाळ राज्य करणार आहे.
  • 50:17 येशू आपल्या राज्यामध्ये शांतीने व न्यायाने व राज्य करील व तो आपल्या लोकांबरोबर सर्वकाळ राहील.

Strong's

  • Strong's: H5117, H7961, H7962, H7965, H7999, H8001, H8002, H8003, H8252, G269, G31514, G1515, G1516, G1517, G1518, G2272