mr_tw/bible/other/father.md

5.7 KiB

पूर्वज, पूर्वजांच्या, बाप, वाडवडील, पूर्वज, प्राचीन, आजा

व्याख्या:

जेंव्हा शब्दशः उपयोग केला जातो, तेंव्हा "बाप" या शब्दाचा संदर्भ एकाद्या व्यक्तीच्या पुरुष पाळकाशी येतो. या शब्दाचे अनेक लाक्षणिक उपयोग देखील आहेत.

"बाप" आणि "पूर्वज" या शब्दांचा सहसा उपयोग विशिष्ठ व्यक्तीचे किंवा लोकसमुहाच्या पुरुष पूर्वजांना संदर्भित करण्यासाठी केला जातो. ह्याचे भाषांतर "पूर्वज" किंवा "वडिलांचे वडील" असेही केले जाऊ शकते.

  • "चे बाप" या अभिव्यक्तीचा लाक्षणिक अर्थाने संदर्भ, एखाद्या व्यक्तीशी आहे, जो संबंधित लोकांच्या समूहाचा पुढारी किंवा एखाद्या गोष्टीचा स्त्रोत आहे. उदाहरणार्थ, उत्पत्ति 4 मध्ये "जे तंबूमध्ये राहिले त्या सर्वांचा पिता" ह्याचा अर्थ "तंबूत वास्तव्य करणाऱ्या सर्वात पहिल्या लोकांच्या कुळाचा पुढारी" असा होतो.
  • प्रेषित पौलाने, ज्याने त्यांना सुवार्ता सांगून ख्रिस्ती बनण्यास मदत केली होती त्या सर्वांचा "पिता" असे लाक्षणिक अर्थाने स्वतःला म्हंटले आहे.

भाषांतर सूचना

  • जेंव्हा वडील आणि त्याच्या प्रत्यक्ष मुलाबद्दल बोलले जाते, तेंव्हा या शब्दाचे भाषांतर त्या भाषेतील पित्याला संदर्भित करणाऱ्या सामान्य शब्दाने करायला हवे.
  • "देव जो बाप" ह्याचे भाषांतरसुद्धा "बाप" या साठी वापरण्यात येणाऱ्या सामान्य शब्दाने करायला हवे.
  • जेंव्हा पूर्वजांना संदर्भित केले जाते, तेंव्हा या शब्दाचे भाषांतर "पूर्वज" किंवा "पूर्वजांचे पूर्वज" असे केले जाऊ शकते.
  • जेंव्हा पौल स्वतःला, लाक्षणिक अर्थाने ख्रिस्तामधील विश्वासणाऱ्यांचा पिता असे संदर्भित करतो, तेंव्हा ह्याचे भाषांतर "आत्मिक पिता" किंवा "ख्रिस्तामधील पिता" असे केले जाऊ शकते.
  • काहीवेळा "वडील" हा शब्द "कुळाचा पुढारी" असा सुद्धा भाषांतरित केला जाऊ शकतो.
  • "सर्व खोट्यांचा बाप" या वाक्यांशाचे भाषांतर "सर्व खोट्यांचा स्त्रोत" किंवा "असा एक ज्यापासून सर्व खोटे आले आहे" असे केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: देव जो बाप, पुत्र, देवाचा पुत्र)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H1, H2, H25, H369, H539, H1121, H1730, H1733, H2524, H3205, H3490, H4940, H5971, H7223, G256, G540, G1080, G2495, G3737, G3962, G3964, G3966, G3967, G3970, G3971, G3995, G4245, G4269, G4613