mr_tw/bible/other/decree.md

3.1 KiB

आज्ञा, नियम, आदेश दिला

व्याख्या:

एक आज्ञा म्हणजे घोषणा किंवा नियम आहे, ज्याला सार्वजनिकरीत्या सर्व लोकांच्यामध्ये जाहीर केले जाते.

  • देवाच्या नियमांना सुद्धा आज्ञा, कायदा किंवा देशवारी आज्ञा असे म्हंटले जाते.
  • कायदे आणि आज्ञा या सारखेच, नियमांचे सुद्धा पालन केले पाहिजे.
  • एक मानवी शासकाने दिलेल्या आज्ञेच्या उदाहरणामध्ये, कैसर अगुस्त ह्याने केलेल्या घोषणेचा समावेश होतो, ज्यामध्ये, त्याने सांगितले की, रोमी साम्राज्यामध्ये राहणाऱ्या प्रत्यकाने आपापल्या मूळ गावी जाऊन तेथे त्यांची शिरगणती करण्यात यावी.
  • एखाद्या गोष्टीची आज्ञा देणे म्हणजे असा हुकूम देणे ज्याचे पालन झालेच पाहिजे. ह्याचे भाषांतर, "हुकूम" किंवा "आज्ञा" किंवा "औपचारिकरित्या गरजेचे" किंवा "सार्वजनिकरीत्या बनवलेला नियम" असे केले जाऊ शकते.
  • असे काहीतरी जे घडेल असा "आदेश दिला' त्याचा अर्थ "ते निश्चितच घडेल" किंवा "यावर निर्णय घेण्यात आला आहे आणि तो बदलणार नाही" किंवा "पूर्णपणे घोषित केले की हे होईल" असा होतो.

(हे सुद्धा पहा: आदेश, जाहीर, नियम, घोषणा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H559, H633, H1697, H5715, H1504, H1510, H1881, H1882, H1696, H2706, H2708, H2710, H2711, H2782, H2852, H2940, H2941, H2942, H3791, H3982, H4055, H4406, H4941, H5407, H5713, H6599, H6680, H7010, H8421, G1378