mr_tw/bible/other/chief.md

2.5 KiB

मुख्य (प्रमुख), मोठे अधिकारी (सरदार)

व्याख्या:

"मुख्य" हा शब्द, एखाद्या विशिष्ठ गटातील सर्वात शक्तिशाली किंवा सर्वात महत्वाच्या नेत्याला संदर्भित करण्यासाठी वापरला जातो.

  • ह्याच्या उदाहरणामध्ये, "मुख्य संगीतकार," "मुख्य याजक," आणि "मुख्य जकातदार," आणि "मुख्य शासक" ह्यांचा समावेश होतो.
  • ह्याचा उपयोग एखाद्या विशिष्ठ कुटुंबाच्या प्रमुखासाठी देखील केला जातो, जसे की उत्पत्ति 36 मध्ये विशिष्ठ मनुष्यांचा त्यांच्या कुळांचे "मुख्य" म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. काही संदर्भामध्ये, "मुख्य" या शब्दाचे भाषांतर "नेता" किंवा "कुलपिता" असे केले जाऊ शकते.
  • जेंव्हा नामाचे वर्णन करण्याकरिता वापरले जाते, तेंव्हा ह्याचे भाषांतर "अग्रभागी" किंवा "सत्ताधारी," असे केले जाऊ शकते, जसे की, "अग्रभागी असलेला संगीतकार" किंवा "सत्ताधारी याजक,"

(हे सुद्धा पहा: मुख्य याजक, याजक, जकातदार)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H47, H441, H5057, H5387, H5632, H6496, H7218, H7225, H7227, H7229, H7262, H8269, H8334, G749, G750, G754, G4410, G4413, G5506