mr_tw/bible/other/bread.md

4.9 KiB

भाकर

व्याख्या:

भाकर हे एक अन्न आहे, जे पिठापासून तयार करण्यासाठी त्यात पाणी आणि तेल मिसळून त्याची कणिक तिंबली जाते. तिंबलेल्या कणकेला पावाच्या तुकड्याचा आकार देऊन त्याला भाजले जाते.

  • जेंव्हा "पाव" हा शब्द स्वतःच उद्भवतो, तेंव्हा त्याचा अर्थ "पावाची भाकर" असा होतो.
  • पावाची कणिक ही सहसा अशा वस्तूंनी बनवली जाते, जेणेकरून ती फुगून वर येईल, जसे की खमीर.
  • खमीर न घालता सुद्धा भाकर बनवता येते, जेणेकरून ती फुगणार नाही. पवित्र शास्त्रामध्ये ह्याला "बेखमीर भाकर" असे म्हंटले जाते आणि जिचा उपयोग यहूद्यांच्या वल्हांडणाच्या जेवणासाठी करतात.
  • पवित्र शास्त्राच्या काळात, भाकर हे बऱ्याच लोकांसाठी मुख्य अन्न असल्यामुळे, या शब्दाचा वापर बायबलमध्ये सामान्यतः अन्न संदर्भित करण्यासाठी केला जातो. (पहा: सिनेकडॉक
  • "उपस्थितीची भाकर" या शब्दाचा संदर्भ बारा भाकरीच्या तुकड्यांशी आहे, जे सभामंडपातील सोनेरी मेजावर किंवा मंदिराच्या इमारतीमध्ये देवाला बलीदान म्हणून ठेवत असत. या पावाच्या तुकड्यांनी इस्राएलाच्या बारा गोत्रांचे प्रतिनिधित्व केले आणि ते फक्त याजकांनी खावयाचे होते. ह्याचे भाषांतर "देव त्यांच्यामध्ये राहतो हे दाखवण्यासाठी ठेवलेली भाकर" असे केले जाऊ शकते.
  • "स्वर्गातून भाकर" या लाक्षणिक शब्दाचा संदर्भ विशेष पांढऱ्या अन्नाशी आहे, ज्याला "मान्ना" असे म्हणतात, जे देवाने इस्राएलांना वाळवंटात भटकत असताना दिले.
  • येशूने देखील स्वतःला "स्वर्गातून खाली आलेली भाकर" आणि "जीवनाची भाकर" असे म्हंटले आहे.
  • जेव्हा येशू आणि त्याचे शिष्य त्याच्या मृत्यूच्या आधीचे वल्हांडणाचे भोजन खात होते, तेव्हा त्याने बेखमीर वल्हांडणाच्या भाकरीची तुलना त्याच्या शरीराशी केली, जे वधस्तंभावर जखमी आणि मारले जाणार होते.
  • अनेक वेळा "भाकर" या शब्दाचे भाषांतर अधिक सामान्यारुपाने "अन्न" म्हणून केले आहे.

(हे सुद्धा पहा: वल्हांडण, सभामंडप, मंदिर, बेखमीर भाकर, खमीर)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H2557, H3899, H4635, H4682, G106, G740, G4286