mr_tw/bible/other/assembly.md

4.3 KiB

मंडळी, मंडळ्या, जमवणे, जमविले

व्याख्या:

"मंडळी" या शब्दाचा अर्थ सहसा अशा लोकांशी संबंधित असतो जे समस्यांबद्दल चर्चा करण्यास, सल्ला देण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी एकत्र येतात.

  • मंडळी एक गट असू शकतो जो अधिकृत आणि काहीसे कायम स्वरूपात आयोजित केला जातो किंवा ते एखाद्या विशिष्ट उद्देशासाठी किंवा प्रसंगी तात्पुरते एकत्र येणारे लोक असतात.
  • जुना नियमांत एक खास प्रकारची मंडळी होती जीला "पवित्र सभा" म्हटले जाते ज्यामध्ये इस्राएल लोक यहोवाची उपासना करण्यासाठी एकत्र जमत असत.
  • काहीवेळा "मंडळी" हा शब्द सर्वसामान्यपणे इस्राएलमध्ये एक समूह म्हणून संदर्भित होतो.
  • शत्रू सैनिकांच्या मोठ्या एकत्र जमलेल्या जमावाला कधीकधी "मंडळी" म्हणूनही संदर्भित केले जाते. याचे भाषांतर "सैन्य" म्हणून केले जाऊ शकते.
  • नवीन करारांमध्ये यरुशलेमसारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये 70 यहूदी नेत्यांची मंडळी कायदेशीर बाबींचा न्यायनिवाडा करण्यासाठी आणि लोकांमधील विवाद सोडवण्यासाठी एकत्र येत असे. या मंडळीला "यहुदी सभा" किंवा "परिषद" म्हणून ओळखले जात होते.

भाषांतर सूचना

  • संदर्भावर अवलंबून, "मंडळी" हा शब्द "विशेष सभा" किंवा "मंडळी" किंवा "परिषद" किंवा "सेना" किंवा "मोठे गट" असे देखील भाषांतरित केले जाऊ शकते.
  • जेव्हा "मंडळी" हा शब्द सर्वसामान्यपणे इस्राएली लोकांना सूचित करतो, तेव्हा त्याचे भाषांतर "समुदाय" किंवा "इस्राएलचे लोक" असे देखील होऊ शकते.
  • "सर्व मंडळी" या वाक्यांशाचे भाषांतर "सर्व लोक" किंवा "इस्राएल लोकांचा संपूर्ण गट" किंवा "प्रत्येकजण" म्हणून करता येईल. (पहा: हायपरबोले

(हे सुद्धा पहा: परिषद)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H622, H627, H1413, H1481, H2199, H3259, H4150, H4186, H4744, H5475, H5712, H5789, H6116, H6633, H6908, H6950, H6951, H6952, H7284, G1577, G1997, G3831, G4863, G4864, G4871, G4905