mr_tw/bible/names/baal.md

4.9 KiB
Raw Blame History

बाल

तथ्य:

"बाल" म्हणजे "प्रभु" किंवा "स्वामी" हे कनानी लोकांद्वारे उपासना केल्या गेलेल्या पहिल्या खोट्या देवाचे नाव होते.

  • तेथे अनेक स्थानिक खोट्या देवतांची देखील "बाल" अशी नावे होती, त्यापैकी "बाल पौर" हे एक नाव होते. कधीकधी हे सर्व देव एकत्रितपणे "बाल" म्हणून ओळखले जातात.
  • काही लोकांची नावे अशी होती ज्यात "बाल" हा शब्द समाविष्ट होता.
  • बालच्या उपासनेत लहान मुलांचा बळी देणे व वेश्यांचा उपयोग करणे यासारख्या वाईट दुष्कृत्यांचा समावेश होता.
  • इस्राएल लोकांनी त्यांच्या इतिहासादरम्यान वेगवेगळ्या कालखंडात, त्यांच्याभोवती असलेल्या मूर्तिपूजक राष्ट्रांचे अनुकरण करत इस्राएली लोक बालच्या उपासनेत गंभीरपणे सामील झाले होते.
  • राजा अहाबाच्या कारकीर्दीत, परमेश्वराचा संदेष्टा एलीया याने बालचे अस्तित्व नाही आणि यहोवा केवळ एकच खरा देव आहे हे लोकांसमोर सिद्ध करण्यासाठी एक परीक्षा दिली. याचा निष्कर्ष म्हणून, बालच्या संदेष्ट्यांचा नाश झाला आणि लोकांनी पुन्हा यहोवाची उपासना करण्यास सुरुवात केली.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: अहाब, अशेरा, एलीया, खोटे देव, वेश्या, यहोवा

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 19:02 अहाब हा एक दुष्ट राजा होता व त्याने लोकांस बाल देवाची उपासना करावयास प्रोत्साहित केले.
  • 19:06 तेंव्हा इस्त्रायलाच्या राज्यातील सर्व लोक, बाल देवतेच्या 450 संदेष्टयांसहित कर्मेल डोंगराकडे आले. एलीया लोकांस म्हणाला,‘‘तुम्ही किती वेळ आपले मन बदलत राहणार ? जर याव्हे हा खरा देव असेल तर त्याचीच सेवा करा! जर बाल देव असेल, तर त्याची सेवा करा!”
  • 19:07 मग एलीया बाल देवतांच्या संदेष्टयांस म्हणाला,‘‘एक बैल मारा व अर्पण तयार करा, पण त्यास आग लावू नका.
  • 19:08 मग बाल देवतेचे संदेष्टये प्रार्थना करु लागले,बाल देवता, आमचे ऐका!
  • 19:12 तेंव्हा लोकांनी बाल च्या संदेष्ट्यांना पकडले. नंतर एलीयाने त्यांना दूर नेऊन मारून टाकले.

Strong's

  • Strong's: H1120, G896