mr_tw/bible/kt/sanctify.md

3.8 KiB

पवित्र करणे, पवित्र करणारा, पवित्रीकरण

व्याख्या:

पवित्र करणे म्हणजे बाजूला करणे किंवा पवित्र बनवणे. पवित्रीकरण ही पवित्र बनण्याची प्रक्रिया आहे.

  • जुन्या करारामध्ये, विशिष्ठ लोकांना आणि गोष्टींना पवित्र केले जात होते, किंवा देवाच्या सेवेसाठी बाजूला केले जात होते.
  • नवीन करार असे शिकवते की, जे लोक येशूवर विश्वास ठेवतात, त्यांना देव पवित्र करतो. ह्याचा अर्थ, तो त्यांना पवित्र करतो आणि त्याच्या सेवेसाठी त्यांना वेगळे करतो.
  • येशूच्या विश्वासनाऱ्यांना सुद्धा देवासाठी स्वतःला पवित्र करण्याची आज्ञा दिलेली आहे, जे काही ते करतील त्यामध्ये पवित्र असण्याची आज्ञा.

भाषांतर सूचना:

  • संदर्भावर आधारित, "पवित्र करणे" या शब्दाचे भाषांतर "बाजूला करणे" किंवा "पवित्र बनवणे" किंवा "शुद्ध करणे" असे केले जाऊ शकते.
  • जेंव्हा लोक स्वतःला पवित्र करतात, तेंव्हा ते स्वतःला शुद्ध करतात, आणि देवाच्या सेवेसाठी स्वतःला समर्पित करतात. बऱ्याचदा "समर्पित करणे" या शब्दाचा उपयोग या अर्थासाठी पवित्र शास्त्रामध्ये केला आहे.
  • जेंव्हा ह्याचा अर्थ "समर्पित करणे" असा होतो, तेंव्हा या शब्दाचे भाषांतर, "देवाच्या सेवेसाठी एखाद्याला किंवा एखाद्या गोष्टीला समर्पित करणे" असे केले जाऊ शकते.
  • संदर्भावर आधारित, "तुमचे पवित्रीकरण" ह्याचे भाषांतर "तुम्हाला पवित्र बनवणे" किंवा "(देवासाठी) बाजूला करणे" किंवा "जे तुम्हाला पवित्र बनवणे" असे केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: समर्पित करणे, पवित्र, बाजूला करणे)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H6942, G37, G38