mr_tw/bible/kt/redeem.md

4.5 KiB

सोडवणे, तारणे (खंडून घेणे), मुक्ती, मुक्तीदाता (तारणारा)

व्याख्या:

"सोडवणे" आणि "मुक्ती" या शब्दाचा संदर्भ काहीतरी किंवा एखाद्याला विकत घेण्याशी आहे, ज्याची आधी मालकी होती किंवा बंदी केलेले होते. "मुक्ती" हे ती करण्याची कृती आहे. एक "मुक्तिदाता" हा असा कोणीतरी आहे, जो काहीतरी किंवा कोणालातरी सोडवतो.

  • देवाने इस्राएलांसाठी लोकांना किंवा वस्तूंना कसे सोडवायचे ह्यासाठी नियम लावून दिले.
  • उदाहरणार्थ, एखादा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला जो गुलामगिरीत आहे त्याची किंमत भरून सोडवू शकतो, म्हणजे तो दास मुक्त होऊ शकतो. "खंडणी" या शब्दाचा अर्थ देखील या रीतीप्रमाणे आहे.
  • जर एखाद्याची जमीन विकली असेल, तर त्या व्यक्तीचा नातेवाईक ती जमीन "सोडवू" किंवा "परत विकत" घेऊ शकतो, जेणेकरून ती जमीन कुटुंबामध्ये राहील.
  • या पद्धतीवरून असे दिसून येते की, देव पापांच्या गुलामगिरीत असलेल्या लोकांना कसे सोडवतो. जेंव्हा तो वधस्तंभावर मेला, तेंव्हा येशूने लोकांच्या पापाबद्दल संपूर्ण किंमत भरली, आणि जे लोक उद्धारासाठी त्याच्यावर विश्वास ठेवतात तो त्यांना सोडवतो. देवाने ज्यांना मुक्त केले आहे ते लोक पाप आणि त्याच्या शिक्षेपासून मुक्त होतात.

भाषांतर सूचना

  • संदर्भाच्या आधारावर, "सोडवणे" या शब्दाचे भाषांतर "परत विकत घेणे" किंवा "(एखाद्याला) मुक्त करण्यासाठी किंमत मोजणे" किंवा "खंडणी" असे केले जाऊ शकते.
  • "मुक्ती" या शब्दाचे भाषांतर "खंडणी" किंवा "स्वातंत्र्याची किंमत" किंवा "परत विकत घेणे" असे केले जाऊ शकते.
  • "खंडणी" आणि "सोडवणे" या शब्दांचा मूळतः समान अर्थ आहे, म्हणून काही भाषेमध्ये या दोन्ही शब्दांचे भाषांतर करण्यासाठी एकच शब्द असू शकतो. "खंडणी" या शब्दाचा अर्थ देखील लागणारी किंमत असा होऊ शकतो.

(हे सुद्धा पहा: मुक्त, खंडणी)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H1350, H1353, H6299, H6302, H6304, H6306, H6561, H7069, G59, G629, G1805, G3084, G3085