mr_tw/bible/kt/life.md

9.8 KiB
Raw Blame History

जीवन, जगेल, जगला, जीव(हालचाल), जिवंत असणे,

व्याख्या:

या सर्व संज्ञा शारीरिकदृष्ट्या जिवंत असल्याचा संदर्भ देतात, मृत नाही. त्यांचा उल्लेख लाक्षणिकरित्या आत्म्यामध्ये जिवंत आहे हे दर्शवण्यासाठी देखील केला जातो. "शारीरिक जीवन" आणि "आध्यात्मिक जीवन" म्हणजे काय यावर खालील चर्चा आहे.

1. शारीरिक जीवन

  • शारीरिक जीवन म्हणजे शरीरातील आत्म्याची उपस्थिती आहे. देवाने आदामाच्या शरीरात जीवनाचा श्वास फुंकला आणि तो जिवंत प्राणी झाला.
  • "जीवन" या शब्दाचा संदर्भ "एक जीव वाचला" या वाक्यांशामध्ये एखाद्या स्वतंत्र व्यक्तीसाठी देखील दिला जाऊ शकतो.
  • काहीवेळा "जीवन" हा शब्द "त्याचे जीवन आनंददायी होते" या वाक्यांशामध्ये जीवनाच्या अनुभवाबद्दल सुद्धा संदर्भित करता येतो.
  • "त्याच्या जीवनाचा शेवट झाला" या शब्द्प्रयोगामध्ये या शब्दाचा संदर्भ एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यासाठीदेखील दिला जाऊ शकतो.
  • "जिवंत" या शब्दाचा संदर्भ शारीरिकदृष्ट्या जिवंत असल्याचा उल्लेख आहे, जसे की "माझी आई अद्याप जिवंत आहे." ते राहत असलेल्या एखाद्या ठिकाणाचा संदर्भही देऊ शकतात, जसे की "ते शहरात राहत होते."
  • पवित्र शास्त्रामध्ये, बऱ्याचदा "जीवन" या संकल्पनेची "मृत्यू" या संकल्पनेशी तुलना केलेली आहे.

2. आत्मिक जीवन

  • एखाद्या व्यक्तीमध्ये आत्मिक जीवन आहे, जेव्हा तो येशूवर विश्वास ठेवतो त्याच बरोबर देव त्या व्यक्तीला त्याच्यामध्ये राहणाऱ्या पवित्र आत्म्याद्वारे बदललेले जीवन देतो.
  • हे जीवन संपत नाही हे सूचित करण्यासाठी त्याला "सार्वकालिक जीवन" असेही म्हटले जाते.
  • आत्मिक जीवनाच्या विरुद्ध आत्मिक मृत्यू आहे, याचा अर्थ म्हणजे देवापासून विभक्त होणे आणि सार्वकालिक शिक्षा अनुभवणे.

भाषांतर सूचना

  • संदर्भाच्या आधारावर, "जीवन" हे "अस्तित्व" किंवा "व्यक्ती" किंवा "आत्मा" किंवा "मानवी प्राणी" किंवा "अनुभव" म्हणून भाषांतरित केले जाऊ शकते.
  • "जीवन" या शब्दाचे भाषांतर "राहणे" किंवा "वास्तव्य" किंवा "अस्तित्वात असणे" असे केले जाऊ शकते.
  • "जेव्हा त्याने जगणे बंद केले" ह्याचे भाषांतर "त्याच्या जीवनाचा शेवट झाला" हा शब्दप्रयोग वापरून सुद्धा करता येते.
  • "त्यांचे जीवन वाचवले" या अभिव्यक्तीचे भाषांतर "त्यांना जगण्यासाठी परवानगी दिली" किंवा "त्यांना ठार केले नाही" असे केले जाऊ शकते.
  • "त्यांनी आपले जीवन धोक्यात घातले" या शब्दाचे भाषांतर "त्यांनी स्वतःला धोक्यात घातले" किंवा "त्यांनी असे काहीतरी केले ज्यामुळे ते मेले असते" असे केले जाऊ शकते.
  • जेव्हा पवित्र शास्त्रामधील मजकूर आत्मिकरित्या जिवंत असण्याविषयी सांगतो, तेव्हा संदर्भाच्या आधारावर "जीवन" हे "आत्मिक जीवन" किंवा "सार्वकालिक जीवन" असे भाषांतरित केले जाऊ शकते.
  • "आत्मिक जीवनाची" संकल्पना देखील "देव आपल्याला आपल्या आत्म्यामध्ये जिवंत करतो" किंवा "देवाच्या आत्म्याद्वारे नवीन जीवन" किंवा "आमची अंतःकरणे जिवंत केली" अशा पद्धतीनी भाषांतरित केली जाऊ शकते.
  • संदर्भावर आधारित, "जीवन देणे" या अभिव्यक्तीचे भाषांतर "जीवन जगण्यास कारणीभूत होणे" किंवा "सार्वकालिक जीवन देणे" किंवा "सार्वकालिक जीवन जगण्यास कारणीभूत होणे" असे देखील होऊ शकते.

(हे सुद्धा पहा: मृत्यू, अनंतकाळ)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 01:10 मग देवाने मातीपासून मनुष्य निर्माण केला व त्याच्या नाकपुड्यात जीवनी श्वास फुंकला.
  • 03:01 बऱ्याच वर्षानंतर, पृथ्वीवर खूप लोकवस्ती वाढली.
  • 08:13 जेंव्हा योसेफाचे भाऊ घरी आले व त्यांनी आपल्या बापास, याकोबास, योसेफ अजून जीवंत आहे असे सांगितले, तेंव्हा याकोबास खूप आनंद झाला.
  • 17:09 तथापी, त्याच्या आयुष्याच्या शेवटी त्याने देवाविरुध्द भयंकर पाप केले.
  • 27:01 एके दिवशी, यहूदी धर्मशास्त्रात पारंगत असलेला एक व्यक्ति येशूची परिक्षा पाहण्यासाठी येऊन म्हणाला,‘‘गुरुजी सार्वकालिक जीवन प्राप्त करण्यासाठी मी काय करावे?
  • 35:05 येशूने उत्तर दिले, "मी पुनरुत्थान आणि जीवन आहे
  • 44:05 "तुम्ही रोमी सम्राटास येशूला जीवे मारावयास सांगितले. * तुम्ही जीवनदात्यास ठार मारिले, परंतु देवाने त्यास मेलेल्यांतून पुन्हा उठविले.

Strong's

  • Strong's: H1934, H2416, H2417, H2421, H2425, H5315, G198, G222, G227, G806, G590