mr_tw/bible/kt/glory.md

62 lines
10 KiB
Markdown
Raw Blame History

This file contains ambiguous Unicode characters

This file contains Unicode characters that might be confused with other characters. If you think that this is intentional, you can safely ignore this warning. Use the Escape button to reveal them.

# गौरव, गौरवशाली, स्तुती करणे (गौरव देणे)
## व्याख्या:
सर्वसाधारणपणे, "गौरव" हा शब्द म्हणजे सन्मान, वैभव आणि अत्यंत श्रेष्ठत्व. ज्याला गौरव आहे त्याला "गौरवशाली" असे म्हटले आहे.
* कधीकधी "गौरव" ह्याचा संदर्भ एका महान मूल्याचे आणि महत्त्वपूर्ण असे काहीतरी याच्याशी आहे. इतर संदर्भांमध्ये तो शोभा, तेज, किंवा न्याय यांचे संप्रेषण करतो.
* उदाहरणार्थ, "मेंढपाळांचे गौरव" या शब्दाचा अर्थ असा आहे की, समृद्ध कुरणे जिथे त्यांच्या मेंढ्यांना भरपूर गवत मिळू शकेल.
* गौरव विशेषत: देवाला वर्णन करण्यासाठी वापरला जातो, जो विश्वातील कोणत्याही व्यक्तीपेक्षा किंवा कोणत्याही गोष्टीपेक्षा अधिक गौरवशाली आहे. त्याच्या वर्णनातील प्रत्येक गोष्ट त्याच्या गौरवाचे व त्याला वैभवात प्रकट करते.
* "अभिमान" या शब्दाचा अर्थ म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल बढाई किंवा अहंकार बाळगणे.
"स्तुती करणे" या शब्दाचा अर्थ कोणीतरी किंवा काहीतरी कितपत मोठा किंवा महत्त्वपूर्ण आहे ते दर्शवणे किंवा सांगणे. याचा शब्दशः अर्थ "एखाद्याला गौरव देणे" असा आहे.
* लोक त्याने केलेल्या अद्भुत गोष्टी सांगून देवाची स्तुती करू शकतात.
* ते अशा प्रकारे जीवन जगून देवाची स्तुती करू शकतात, ज्याने त्याचा सन्मान होईल आणि दाखवून देईल की तो किती महान आणि भव्य आहे.
* जेव्हा पवित्र शास्त्र सांगते की देव स्वतःचे गौरव प्रकट करतो, तेव्हा याचा अर्थ असा होतो की तो लोकांना बऱ्याचदा चमत्कारांद्वारे त्याची अद्भुत महानता दर्शवितो.
* देवपिता देवपुत्राची परिपूर्णता, वैभव, आणि महानता लोकांपर्यंत प्रगट करून देव पुत्राचे गौरव करील.
* प्रत्येकजण जो ख्रिस्तामध्ये विश्वास ठेवतो तो ख्रिस्ताच्या गौरवामध्ये येईल. जेव्हा ते पुनरुत्थित केले जातील, तेव्हा ते त्याचे गौरव प्रतिबिंबित करण्यासाठी आणि सर्व सृष्टीला त्याची कृपा प्रदर्शित करण्यासाठी बदलले जातील.
## भाषांतर सूचना
* संदर्भाच्या आधारावर, "गौरव" या शब्दाचे भाषांतर करण्याच्या पद्धतींमध्ये, "वैभव" किंवा "तेजस्वीपणा" किंवा "ऐश्वर्य" किंवा 'अद्भुत महानता" किंवा "अत्यंत किमती" यांचा समावेश होतो.
* "गौरवशाली" हा शब्द "गौरवाने भरलेला" किंवा "अत्यंत मौल्यवान" किंवा "तेजस्वीपणे चमकणे" किंवा "अद्भूतरित्या भव्य" असाही भाषांतरित केला जाऊ शकतो.
* "देवाला गौरव द्या" या अभिव्यक्तीचे भाषांतर "देवाच्या महानतेचा आदर करा" किंवा "त्याच्या वैभवाबद्दल देवाची स्तुती करा" किंवा "दुसऱ्यांना सांगा की, देव किती महान आहे" असेही केले जाऊ शकते.
* "अभिमान" या शब्दप्रयोगाला "बढाई" किंवा "अहंकार बाळगणे" किंवा "देवाबद्दल अभिमान बाळगणे" किंवा "आनंदित होणे" असेही भाषांतरित केले जाऊ शकते.
* "गौरव देणे" या शब्दाचे भाषांतर "ला गौरव द्या" किंवा "गौरव करा" किंवा "महान दिसण्यास कारण व्हा" असेही केले जाऊ शकते.
* "देवाची स्तुती करा" या वाक्यांशाचे भाषांतर "देवाची स्तुती करा" किंवा "देवाच्या महानतेबद्दल बोला" किंवा देव किती महान आहे दाखवून द्या" किंवा देवाचा सन्मान करा (त्याच्या आज्ञा पाळून)" असेही केले जाऊ शकते.
* "गौरवलेले असणे" हा शब्द "फार महान असल्याचे दाखवलेले असणे" किंवा "स्तुती केलेली असणे" किंवा "उंच केलेले असणे" असाही भाषांतरित केला जाऊ शकतो.
(हे सुद्धा पाहा: [उंच](../kt/exalt.md), [आज्ञापालन](../other/obey.md), [स्तुती](../other/praise.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [निर्गमन 24:16-18](rc://mr/tn/help/exo/24/16)
* [गणना 14:9-10](rc://mr/tn/help/num/14/09)
* [यशया 35:1-2](rc://mr/tn/help/isa/35/01)
* [लुक 18:42-43](rc://mr/tn/help/luk/18/42)
* [लुक 02:8-9](rc://mr/tn/help/luk/02/08)
* [योहान 12:27-29](rc://mr/tn/help/jhn/12/27)
* [प्रेषितांची कृत्ये 03:13-14](rc://mr/tn/help/act/03/13)
* [प्रेषितांची कृत्ये 07:1-3](rc://mr/tn/help/act/07/01)
* [रोमकरास पत्र 08:16-17](rc://mr/tn/help/rom/08/16)
* [1 करिंथकरांस पत्र 06:19-20](rc://mr/tn/help/1co/06/19)
* [फिलीप्पेकरास पत्र 02:14-16](rc://mr/tn/help/php/02/14)
* [फिलीप्पेकरास पत्र 04:18-20](rc://mr/tn/help/php/04/18)
* [कलस्सैकरांस पत्र 03:1-4](rc://mr/tn/help/col/03/01)
* [1 थेस्सलनीकाकरांस पत्र 02:5-6](rc://mr/tn/help/1th/02/05)
* [याकोबाचे पत्र 02:1-4](rc://mr/tn/help/jas/02/01)
* [1 पेत्र 04:15-16](rc://mr/tn/help/1pe/04/15)
* [प्रकटीकरण 15:3-4](rc://mr/tn/help/rev/15/03)
## पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:
* __[23:07](rc://mr/tn/help/obs/23/07)__ अचानक, आकाशामध्ये देवदूत देवाची स्तूती करत म्हणाले,‘‘वर स्वर्गात देवाला __गौरव__ आणि पृथ्वीवर ज्या मनुष्यांवर त्याची कृपा झाली आहे त्यांस शांती!
* __[25:06](rc://mr/tn/help/obs/25/06)__ मग सैतानाने येशूला जगातील सर्व राज्ये व __वैभव__ दाखविले व म्हणाला,‘‘जर तू पाया पडून मला नमन करशील तर मी हे सगळे तुला देईन.
* __[37:01](rc://mr/tn/help/obs/37/01)__ जेव्हा येशूने ही बातमी ऐकली तेंव्हा तो म्हणाला, ‘‘हा आजार मरणासाठी नाही, तर हा आजार देवाच्या __गौरवासाठी__ आहे.
* __[37:08](rc://mr/tn/help/obs/37/08)__ येशूने उत्तर दिले, ‘‘तू विश्वास ठेवशील तर देवाचे __गौरव__ पाहशील असे मी तुला सांगितले नव्हते काय?
# Strong's
* Strong's: H117, H142, H155, H215, H1342, H1921, H1922, H1925, H1926, H1935, H1984, H2892, H3367, H3513, H3519, H3520, H6286, H6643, H7623, H8597, G1391, G1392, G1740, G1741, G2620, G2744, G2745, G2746, G2755, G2811, G4888