mr_tw/bible/kt/foolish.md

4.1 KiB

मूर्ख, मुर्खासारखे, वेडेपणा (मूर्खपणा)

व्याख्या:

"मूर्ख" या शब्दाचा संदर्भ अशा व्यक्तीशी आहे, जो नेहमी चुकीची निवड करतो, विशेषकरून आज्ञा न पाळण्याचे निवडतो. "मुर्खासारखे" हा शब्द एखाद्या व्यक्तीचे किंवा स्वभावाचे वर्णन करतो जे शहाणपणाचे नाही.

  • पवित्र शास्त्रामध्ये, "मूर्ख" या शब्दाचा सहसा संदर्भ अशा व्यक्तींशी येतो, जो देवावर विश्वास ठेवत नाही किंवा देवाचे आज्ञापालन करीत नाही. हे बऱ्याचदा शहाणा मनुष्याच्या, जो देवावर विश्वास ठेवतो आणि देवाची आज्ञा पाळतो, त्याच्या विरुद्ध असते.
  • स्तोत्रसंहितेमध्ये, दावीद मूर्ख मनुष्याचे वर्णन, जो देवावर विश्वास ठेवीत नाही, आणि जो देवाच्या निर्मितीमधील त्याच्या सर्व पुराव्यांकडे दुर्लक्ष करतो, असे करतो.
  • जुन्या करारातील पुस्तक नीतीसूत्रे सुद्धा मूर्ख किंवा मूर्खासारख्या मनुष्य कसा असतो ह्याचे अनेक वर्णन देते.
  • "मूर्खपणा" या शब्दाचा संदर्भ कृत्यांशी आहे, जी शहाणपणाची नाहीत कारण ती देवाच्या इच्छेविरुद्ध आहेत. बऱ्याचदा "मूर्खपणा" ह्यामध्ये एखादी गोष्ट जी हास्यास्पद किंवा धोकादायक आहे ह्याचा सुद्धा समावेश होतो.

भाषांतर सूचना

  • "मूर्ख" या शब्दाचे भाषांतर "मुर्खासारखा मनुष्य" किंवा "अविवेकी मनुष्य" किंवा "बेसावध मनुष्य" किंवा "दुष्ट मनुष्य" असे केले जाऊ शकते.
  • "मूर्खपणा" ह्याचे भाषांतर करण्याच्या इतर पद्धतींमध्ये, "समजूतदारपणाचा अभाव असणारे" किंवा "अविवेकी" किंवा "बेसावध" ह्यांचा समावेश होतो.

(हे सुद्धा पहा: शहाणा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H191, H196, H200, H1198, H1984, H2973, H3684, H3687, H3688, H3689, H3690, H5034, H5036, H5039, H5528, H5529, H5530, H5531, H6612, H8417, H8602, H8604, G453, G454, G781, G801, G877, G878, G3471, G3472, G3473, G3474, G3912