mr_tw/bible/kt/fellowship.md

3.1 KiB

सह्भागीता

व्याख्या:

सामान्यपणे, "सह्भागीता" या शब्दाचा संदर्भ लोकांच्या समूहातील सदस्यांमधील मैत्रीपूर्ण संवादाशी आहे, जे समान रुची आणि अनुभव सामायिक करतात.

पवित्र शास्त्रामध्ये, "सह्भागीता" या शब्दाचा संदर्भ ख्रिस्तामधील विश्वासनाऱ्यांच्या एकतेशी आहे.

  • ख्रिस्ती सह्भागीता हा विश्वासणाऱ्यांचे ख्रिस्त आणि पवित्र आत्म्याबरोबर असलेल्या संबंधाद्वारे एकमेकांशी असलेला सामायिक नातेसंबंध आहे.
  • आद्य ख्रिस्ती लोक त्यांची सह्भागीता देवाच्या वचनांना ऐकण्याद्वारे आणि एकत्रित प्रार्थना करण्याद्वारे, त्यांच्या मालकीच्या वस्तू सामायिक करण्याद्वारे आणि एकत्रित जेवण करण्याद्वारे व्यक्त करतात.
  • ख्रिस्ती लोक सुद्धा येशूवरील विश्वासाच्याद्वारे आणि त्याच्या वधस्तंभावरील याज्ञासंबंधीच्या मरणाद्वारे, ज्याने देव आणि लोक ह्यांच्या मधील अडसर दूर केला, देवाबरोबर सह्भागीता करू शकतात.

भाषांतर सूचना

  • "सह्भागीता" ह्याचे भाषांतर करण्याच्या पद्धतींमध्ये, "एकत्रित सामायिक करणे" किंवा "नातेसंबंध" किंवा "सख्य" किंवा "ख्रिस्ती समुदाय" असे केले जाऊ शकते.

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H2266, H8667, G2842, G2844, G3352, G4790