mr_tw/bible/kt/cornerstone.md

3.8 KiB

कोनशीला

व्याख्या:

"कोनशीला" या शब्दाचा संदर्भ एका मोठ्या दगडाशी आहे, ज्याला खास कापला जातो आणि इमारतीच्या पायाच्या कोपऱ्यात बसवला जातो.

  • इमारतीचे बाकीचे इतर दगडांना मोजमाप करून कोनशिलेच्या संबंधात बसवण्यात येते.
  • हे संपूर्ण रचनेच्या भक्कमपणा आणि स्थिरता ह्यासाठी खूप महत्वाचे आहे.
  • नवीन करारामध्ये, विश्वासणाऱ्यांनी एकत्र जमण्याची रूपक अर्थाने इमारतीशी तुलना केली आहे, ज्यामध्ये येशू ख्रिस्त त्याची "कोनशीला" आहे.
  • ज्याप्रकारे इमारतीची कोनशीला संम्पूर्ण इमारतीला आधार देते आणि त्याची स्थिती ठरवते, त्याचप्रमाणे येशू ख्रिस्त कोनशीला आहे ज्यावर विश्वरणाऱ्यांच्या मंडळीचा पाया घातला आणि त्याला आधार दिला आहे.

भाषांतर सूचना

  • "कोनशीला" या शब्दाचे भाषांतर "इमारतीचा मुख्य दगड" किंवा "पायाचा दगड" असे देखील केले जाऊ शकते.
  • प्रकल्पित भाषेत इमारतीच्या पायाचा भाग, जो मुख्य आधार आहे, त्यासाठी एखादा शब्द आहे काय, हे विचारात घ्या. तसे असल्यास तो शब्द वापरला जाऊ शकतो.
  • ह्याचे भाषांतर करण्याचा इतर मार्ग "इमारतीच्या कोपऱ्यासाठी वापरण्यात येणारा पायाचा दगड" असा असू शकतो.
  • तो एक मोठा दगड आहे, ज्याचा उपयोग इमारतीची भक्कम आणि सुरक्षितसामग्री म्हणून करतात, हे तथ्य तसेच ठेवणे हे महत्वाचे आहे. जर इमारतींच्या बांधकामामध्ये दगड वापरत नसतील, तर तिथे कदाचित दुसरा शब्द, ज्याचा अर्थ "मोठा दगड" (जसे की "धोंडा") ह्याचा उपयोग केला जाऊ शकतो, पण त्याच्यामध्ये तो व्यवस्थित तयार आणि घट्ट बसण्यासाठी बनवल्याची कल्पना असावी.

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H68, H6438, H7218, G204, G1137, G2776, G3037