mr_tw/bible/kt/call.md

8.5 KiB

बोलावणे, म्हणणे, पाचारण (बोलवत आहे), बोलावले

व्याख्या:

"बोलावणे" आणि "आरोळी मारणे" ह्याचा अर्थ जेंव्हा एखादा जवळ नसतो, तेंव्हा त्याला मोठ्याने काहीतरी सांगणे. एखाद्याला "बोलावणे" म्हणजे त्याला विशिष्ठ ठिकाणी विशिष्ठ कामासाठी हजर राहा म्हणून सांगणे. त्याचे इतर काही अर्थ देखील आहेत.

  • एखाद्याचे "नाव पुकारणे" ह्याचा अर्थ जो कोणी लांब आहे त्याला ओरडून किंवा मोठ्याने बोलून बोलावणे. ह्याचा अर्थ एखाद्याला मदत करण्यासाठी विचारणे असा देखील होतो, विशेषतः देवाला.
  • पवित्र शास्त्रामध्ये बऱ्याचदा, "बोलावणे" ह्याचा अर्थ "फर्मावने" किंवा "येण्याची आज्ञा देणे" किंवा "येण्याची विनंती करणे" असा होतो.
  • देव लोकांना त्याच्याकडे येण्यासाठी आणि त्याचे लोक बनण्यासाठी बोलावतो. हे त्यांचे "पाचारण" आहे.
  • जेंव्हा देव लोकांना "बोलावतो," ह्याचा अर्थ देवाने लोकांना त्याची मुले होण्याकरिता, त्याचे सेवक होण्याकरिता आणि येशूच्या द्वारे तारणाच्या संदेशाची घोषणा करण्याकरिता नियुक्त केले किंवा निवडले आहे.
  • या शब्दाचा उपयोग एखाद्याचे नाव संदर्भित करण्यासाठी सुद्धा केला जातो. उदाहरणार्थ, "त्याचे नाव योहान असे आहे," ह्याचा अर्थ "त्याचे नाव योहान असे ठेवण्यात आले" किंवा "त्याचे नाव योहान आहे."
  • "या नावाने बोलवले जाणे" ह्याचा अर्थ एखाद्याने कोण एकाला हे नाव दिले आहे. देव म्हणतो की, त्याने त्याच्या नावाने लोकांना बोलावले आहे.
  • एक वेगळी अभिव्यक्ती, मी तुला तुझ्या नावाने बोलावले आहे" ह्याचा अर्थ देवाने त्या व्यक्तीला विशिष्ठ पद्धतीने निवडले आहे.

भाषांतर सूचना

  • "बोलावणे" या शब्दाचे भाषांतर, "फर्मावने" या अर्थाच्या शब्दाद्वारे केले जाऊ शकते, ज्यामध्ये हेतुपुरस्सर असल्याची कल्पना किंवा हेतुपूर्ण बोलावणे याचा समावेश आहे.
  • "तुला बोलावले आहे" या अभिव्यक्तीचे भाषांतर "तुला मदतीसाठी विचारले आहे" किंवा "तुला त्वरित प्रार्थना करतो" असे केले जाऊ शकते.
  • जेंव्हा पवित्र शास्त्र म्हणते की, देवाने तुला त्याचा सेवक होण्यासाठी "बोलावले" आहे, ह्याचे भाषांतर "आपल्याला विशेषरित्या निवडले आहे" किंवा "त्याचे सेवक होण्यासाठी आपल्याला "नियुक्त केले" आहे असे केले जाऊ शकते.
  • "आपण त्याच्या नावाला बोलावणे आवश्यक आहे" ह्याचे भाषांतर "आपण त्याचे नाव घेणे आवश्यक आहे" असेही केले जाऊ शकते.
  • "त्याला या नावाने बोलावण्यात येते" ह्याचे भाषांतर "त्याचे नाव आहे" किंवा "त्याचे नाव घेतले आहे" असेही केले जाऊ शकते.
  • "आरोळी मरणे" ह्याचे भाषांतर "मोठ्याने बोलणे" किंवा "ओरडणे" किंवा मोठ्या आवाजात सांगणे" असे केले जाऊ शकते. * या शब्दाचे भाषांतर करताना, तो व्यक्ती क्रोधीत आहे असा भास होत नाही ह्याची खात्री करा.
  • "तुमचे बोलावणे" या अभिव्यक्तीचे भाषांतर "तुमचा हेतू" किंवा "तुमच्यासाठी देवाचा हेतू" किंवा तुमच्यासाठी देवाचे विशेष काम" असे केले जाऊ शकते.
  • "देवाच्या नावाने हक मरणे" ह्याचे भाषांतर "देवाला शोधणे आणि त्याच्यावर अवलंबून राहणे" किंवा "देवावर विश्वास ठेवणे आणि त्याची आज्ञा पाळणे" असेही केले जाऊ शकते.
  • "कश्यासाठी साठी तरी बोलावणे" ह्याचे भाषांतर "मागणी करणे" किंवा "काहीतरी मागणे" किंवा "आज्ञा देणे" असे केले जाऊ शकते.
  • "तुम्हाला माझ्या नावाने बोलावले आहे" या अभिव्यक्तीचे भाषांतर "तुम्ही माझे आहात हे दाखवण्यासाठी मी तुम्हाला माझे नाव दिले आहे" असे केले जाऊ शकते.
  • जेंव्हा देव म्हणतो "मी तुला तुझ्या नावाने बोलावले आहे" ह्याचे भाषांतर "मी तुला ओळखतो आणि मी तुला निवडले आहे" असे केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: प्रार्थना)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

{{tag>publish ktlink}

Strong's

  • Strong's: H559, H2199, H4744, H6817, H7121, H7123, G154, G363, G1458, G1528, G1941, G1951, G2028, G2046, G2564, G2821, G2822, G2840, G2919, G3004, G3106, G3333, G3343, G3603, G3686, G3687, G4316, G4341, G4377, G4779, G4867, G5455, G5537, G5581