mr_tw/bible/kt/boast.md

4.9 KiB

अभिमान (बढाई), फुशारून जाणे, बढाईखोर

व्याख्या:

"बढाई" या शब्दाचा अर्थ कश्याबद्दल किंवा कोणाबद्दल तरी गर्वाने बोलणे असा होतो. बऱ्याचदा ह्याचा अर्थ स्वतःबद्दल बढाई मारणे असा होतो.

  • जो "बढाईखोर" आहे, तो गर्वाने स्वतःबद्दल बोलतो.
  • देवाने इस्राएली लोकांना त्यांच्या मूर्तींविषयी "अभिमान" बाळगण्याबद्दल दोष लावला. त्यांनी खऱ्या देवाची आराधना करण्याऐवजी, उद्धटपणे खोट्या देवांची उपासना केली.
  • पवित्र शास्त्रामध्ये असेही सांगितले आहे, की लोक आपल्या संपत्तीचा, त्यांच्या ताकदीचा, त्यांच्या फलदायी क्षेत्राचा आणि त्यांच्या कायद्यांबद्दल अभिमान बाळगतात. ह्याचा अर्थ त्यांना या गोष्टींबद्दल गर्व होता, आणि देवच एक आहे, जो या सर्व गोष्टी पुरविनारा आहे, हे त्यांनी मान्य केले नाही.
  • त्याऐवजी देवाने इस्राएल लोकांना आवाहन केले की, ते देवाला ओळखतात या गोष्टीचा त्यांनी "अभिमान" किंवा गर्व बाळगावा.
  • प्रेषित पौलाने देखील प्रभुमध्ये अभिमान बाळगण्याचा उल्लेख केला आहे, ह्याचा अर्थ त्याने आपल्याला जे काही केले आहे त्याबद्दल आनंदित होऊन त्याचे आभार मानणे असा होतो.

भाषांतर सूचना

  • "अभिमान" ह्याचे भाषांतर करण्याच्या इतर पद्धतींमध्ये "बढाई' किंवा "गर्वाने बोलणे" किंवा "गर्व असणे" ह्यांचा समावेश होतो.
  • "बढाईखोर" या शब्दाचे भाषांतर "गर्विष्ठ भाषणाने भरलेला" किंवा "गर्विष्ठ" किंवा "स्वतःबद्दल गर्वाने बोलणारा" अशा अर्थाच्या शब्दांनी किंवा वाक्यांशांनी केले जाऊ शकते.
  • देवाला जाणून घेणे किंवा त्याच्याविषयी अभिमान बाळगण्याच्या संदर्भात ह्याचे भाषांतर "चा अभिमान असणे" किंवा "उंच" किंवा "च्या बद्दल खूप आनंदित असणे" किंवा "च्या बद्दल देवाचे आभार माना" असे केले जाऊ शकते.
  • काही भाषेमध्ये "गर्व" साठी दोन शब्द असतात: एक म्हणजे नकारात्मक, गर्विष्ठ असण्याच्या अर्थाने आणि दुसरा जो सकारात्मक आहे, एखाद्याच्या कामाचा, कुटुंबाचा किंवा देशाचा अभिमान व्यक्त करण्याच्या अर्थाने.

भाषांतर सूचना

(हे सुद्धा पहा: गर्व)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H1984, H3235, H6286, G212, G213, G2620, G2744, G2745, G2746, G3166