mr_tw/bible/kt/blood.md

6.4 KiB
Raw Blame History

रक्त

व्याख्या:

"रक्त" या शब्दाचा संदर्भ एक लाल द्रव जो एका व्यक्तीच्या त्वचेमधून त्याला दुखापत किंवा जखम झाल्यावर बाहेर येतो. एखाद्याच्या संपूर्ण शरीरात जीवनदायी पोषणतत्व आणण्याचे काम रक्त करते.

  • रक्त जीवनाचे प्रतिक आहे, आणि जेंव्हा ते सांडले किंवा ओतले जाते, त्याचे चिन्ह जीवनाचे नुकसान किंवा मृत्यू असा होतो.
  • जेंव्हा लोक देवाला बलिदान अर्पण करतात, ते प्राण्याला मारतात आणि त्याचे रक्त वेदीवर ओततात. हे लोकांच्या पापाबद्दलची किंमत म्हणून प्राण्यांच्या जीवनाचे बलिदान चिन्हांकित होते.
  • वधस्तंभावरील त्याच्या मृत्यूमुळे, येशूचे रक्त प्रतिकात्मकरित्या लोकांना त्यांच्या पापातून मुक्त करतात आणि त्या पापासाठी त्यांना मिळणाऱ्या शिक्षेसाठी किंमत भरली.
  • "मांस आणि रक्त" या अभिव्यक्तीचा संदर्भ मनुष्याशी आहे.
  • "स्वतःचे मांस आणि रक्त" या अभिव्यक्तीचा संदर्भ जैविकदृष्ट्या संबंधित असलेल्या मनुष्याशी आहे.

भाषांतर सूचना

  • या शब्दाचे भाषांतर लक्षित भाषेमध्ये करताना रक्तासाठी वापरल्या जाणारे शब्द वापरून केले जाऊ शकते.
  • "मांस आणि रक्त" या अभिव्यक्तीचे भाषांतर "लोक" किंवा "मनुष्य" असे केले जाऊ शकते.
  • संदर्भावर आधारित, "माझे स्वतःचे मांस आणि रक्त" या अभिव्यक्तीचे भाषांतर "माझे स्वतःचे कुटुंब" किंवा "माझे स्वतःचे नातेवाईक" किंवा "माझे स्वतःचे लोक" असे केले जाऊ शकते.
  • जर या अर्थाची अभिव्यक्ती लक्षित भाषेमध्ये असेल तर, ती अभिव्यक्ती "मांस आणि रक्त" याचे भाषांतर करण्यासाठी वापरली जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: मांस)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 08:03 योसेफाच्या भावांनी घरी परतण्यापूर्वी योसेफाचा झगा शेळीच्या रक्तामध्ये बुडवला.
  • 10:03 देवाने नाईल नदीच्या पाण्याचे रक्तामध्ये रूपांतर केले, पण तरीही फारो इस्राएलाची सुटका करावयास तयार झाला नाही.
  • 11:05 इस्राएलाच्या सर्व घरांच्या चौकटीवर कोक-याचे रक्त असल्यामूळे देव त्या घरांना ओलांडून गेला. त्या घरातील सर्वजण सुरक्षित होते. कोक-याच्या रक्तामुळे त्यांचा बचाव झाला होता.
  • 13:09 त्या पशूच्या रक्ताद्वारे त्या व्यक्तीचे पाप झाकले जाऊन ती व्यक्ति देवाच्या दृष्टीने शुद्ध ठरत असे.
  • 38:05 मग येशूने एक प्याला घेऊन म्हटले, ह्यातुन प्या. हा माझे नव्या कराराचे रक्त आहे. ते अनेकांच्या पापक्षमेसाठी ओतले जात आहे.
  • 48:10 जेव्हा कोणी येशूवर विश्वास ठेवितो, तेव्हा येशूच्या रक्ताद्वारे त्याच्या पापांची खंडणी भरून देण्यात येते, आणि देवाची शिक्षा त्या व्यक्तीस ओलांडून जाते.

Strong's

  • Strong's: H1818, H5332, G129, G130, G131, G1420