mr_tw/bible/kt/blameless.md

2.4 KiB

निर्दोष

व्याख्या:

"निर्दोष" या शब्दाचा शब्दशः अर्थ "दोष नसलेला" असा होतो. या शब्दाचा उपयोग अशा व्यक्तीचा संदर्भ देण्यासाठी केला जातो, जो देवाची आज्ञा संपूर्ण मनाने पाळतो, पण ह्याचा अर्थ असा होत नाही की, तो मनुष्य पापविरहित आहे.

  • अब्राहाम आणि नोहा ह्यांना देवासमोर निर्दोष समजण्यात आले.
  • एक व्यक्ती ज्याला "निर्दोष" असे संबोधले जाते, तो अशा प्रकारे वागतो की ज्याने देवाला सन्मान दिला जाईल.
  • एका वाचनाच्या अनुसार, एक मनुष्य जी निर्दोष आहे तो "असा एक आहे जो देवाला भितो आणि वाईटापासून परत फिरतो."

भाषांतर सूचना:

  • ह्याचे भाषांतर "त्याच्या चारित्र्यामध्ये दोष नसलेला" किंवा "संपूर्णपणे देवाची आज्ञा पाळणारा" किंवा "पाप टाळणारा" किंवा "वाईटापासून दूर राहणारा" असे केले जाऊ शकते.

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H5352, H5355, G273, G274, G298, G338, G410, G423