mr_tw/bible/other/tribulation.md

2.1 KiB

क्लेश (त्रास)

व्याख्या:

"क्लेश" या शब्दाचा संदर्भ, कठीण वेळ, त्रास, आणि दुःखाशी आहे.

  • नवीन करारामध्ये हे स्पष्ट केले आहे की, ख्रिस्ती लोकांना छळाच्या आणि इतर प्रकारच्या संकटाचा सामना करावा लागेल, कारण या जगातील बरेच लोक येशूच्या शिकवणींचा विरोध करतात.
  • "महाक्लेश" हा शब्द पवित्र शास्त्रामध्ये वापरला जाणारा असा एक शब्द आहे, ज्याचा उल्लेख येशूचे दुसरे येणे होण्यापूर्वी, जेव्हा देवाचा क्रोध पृथ्वीवर अनेक वर्षांसाठी ओतला जाईल, त्या कालावधीचे वर्णन करण्याकरिता केला जातो.
  • "क्लेश" या शब्दाचे भाषांतर "मोठ्या त्रासाचा काळ" किंवा "अतिशय दुःख" किंवा "तीव्र अडचणी" असे केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: पृथ्वी, शिक्षण, क्रोध)

पवित्र शास्त्रामधील संदर्भ: