mr_tw/bible/other/hard.md

6.8 KiB

कठोर, अतिशय कठीण, कठीण करणे, कठीण करतो, कठीण केले, कठीणपणा, कठोरपणा

व्याख्या:

संदर्भावर आधारित "कठोर" या शब्दाचे अनेक वेगवेगळे अर्थ आहेत. हे सहसा काहीतरी कठीण, सक्तीचे किंवा दुर्दम्य ह्यांचे वर्णन करते.

  • "कठोर अंतःकरण" किंवा "कठोर स्वभाव" या शब्दांचा संदर्भ हट्टी पश्चात्ताप न करणाऱ्या लोकांशी आहे. या अभिव्यक्ती देवाची सतत अवज्ञा करत राहण्याचे वर्णन करतात.
  • "अंतःकरणाच्या कठोरपणामुळे" आणि "त्यांच्या अंतःकरणाच्या कठोरपणामुळे" या लाक्षणिक अभिव्यक्तींचा संदर्भ देखील हट्टी राहून अवज्ञा करण्याशी आहे.
  • जर एखाद्या व्यक्तीचे हृदय "कठीण केलेले" आहे, ह्याचा अर्थ ती व्यक्ती आज्ञा पाळण्यास नकार देते आणि हट्टीपणाने पश्चात्ताप न करता राहते.
  • "कठोर परिश्रम करा" किंवा "कठोर प्रयत्न करा" यामध्ये, जेंव्हा क्रियाविशेषण म्हणून वापरले जाते, तेंव्हा ह्याचा अर्थ खूप जोरदारपणे आणि परिश्रमपूर्वक काहीतरी करा, खूप चांगले काहीतरी करण्याचा प्रयत्न करा असा होतो.

भाषांतर सूचना

  • संदर्भाच्या आधारावर "कठोर" या शब्दाचे भाषांतर "कठीण" किंवा "हट्टी" किंवा "आव्हानात्मक" असे केले जाऊ शकते.
  • "कठोरपणा" किंवा "अंतःकरणाचा कठोरपणा" किंवा "कठोर अंतःकरण" या शब्दांचे भाषांतर "हट्टीपणा" किंवा "सततचा विद्रोह" किंवा "बंडखोर वृत्ती" किंवा "हट्टी अवज्ञा" किंवा "हट्टामुळे पश्चात्ताप न करणे" असे केले जाऊ शकते.
  • "कठोर" या शब्दाचे भाषांतर "हट्टामुळे पश्चात्ताप नसलेला" किंवा "आज्ञा मानण्यास नकार देणे" असे केले जाऊ शकते.
  • "तुमची अंतःकरणे कठोर करू नका" ह्याचे भाषांतर "पश्चात्ताप करण्यास नकार देऊ नका" किंवा "हट्टामुळे अवज्ञा करू नका" असे केले जाऊ शकते.
  • "कठोर स्वभावाचे" किंवा "कठोर अंतःकरणाचे" ह्याचे भाषांतर करण्याचे इतर मार्ग म्हणजे "हट्टी अवज्ञाकारी" किंवा "अवज्ञा करणे सुरूच ठेवणे" किंवा "पश्चात्ताप करण्यास नकार देणे" किंवा "नेहमी बंडखोर" असे होऊ शकतात.
  • "कठोर परिश्रम" किंवा "कठोर प्रयत्न करणे" यासारख्या अभिव्यक्तींमध्ये "कठोर" या शब्दाचे भाषांतर "चिकाटीने" किंवा "परिश्रमपूर्वक" असे केले जाऊ शकते.
  • "च्या विरुद्ध कठोरपणे दाबा' या अभिव्यक्तीचे भाषांतर "ताकतीने जोराचा धक्का देणे" किंवा "च्या विरुद्ध जोरदार ढकलणे" असे देखील केले जाऊ शकते.
  • "कठोर परिश्रम घेऊन लोकांना दडपणे" ह्याचे भाषांतर "लोकांना कठोर परिश्रम करण्यास सक्ती करणे, जेणेकरून त्यांचा छळ होईल" किंवा "लोकांना अतिशय कठोर काम करण्याची सक्ती करून त्याच्या छळास कारणीभूत होणे" असे केले जाऊ शकते.
  • एक वेगळ्या प्रकारच्या "कठीण वेदना" या मुलाला जन्म देण्याच्या वेळी एका महिलेकडून अनुभवल्या जातात.

(हे सुद्धा पहा: अवज्ञा, वाईट, अंतःकरण, प्रसूती वेदना, हेकेखोर)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: