mr_tw/bible/other/curtain.md

3.5 KiB

पडदा, पडदे

व्याख्या:

पवित्र शास्त्रामध्ये, "पडदा" हा शब्द, निवासमंडप व मंदिराचे बांधकाम करण्यासाठी वापरलेल्या साहित्याचा एक अतिशय जाड, भारी भाग होय.

  • निवासमंडप हे पडद्याच्या वरती आणि बाजूला अशा चार स्तरांचा उपयोग करून बांधले होते. या पडद्यांचे आच्छादन कापड किंवा प्राण्यांच्या कातडीपासून बनवलेले होते.
  • निवासमंडपाच्या अंगणाची भिंत आच्छादित करण्यासाठी सुद्धा कपड्यांच्या पडद्याचा उपयोग केला जातो. हे पडदे "ताग" वापरून बनविले गेले होते, जे अंबाडीच्या झाडातून बनवलेले एक प्रकारचे कापड होते.
  • मंदिराची इमारत आणि मंदीर दोन्हीमध्ये, पवित्र स्थान आणि अतिपवित्र स्थान ह्यांच्यामध्ये एक जाड कापडाचा पडदा लात्कावला जात असे.. हा तोच पडदा होता जो अद्भूतरित्या दोन भागांमध्ये जेंव्हा येशू मेला तेंव्हा फाटला गेला.

भाषांतर सूचना

  • आधुनिक काळातील पडदे पवित्र शास्त्रामध्ये वापरल्या जाणाऱ्या पडद्यांपेक्षा खूप वेगळे आहेत, हे अधिक स्पष्ट करण्यासाठी पडद्यांचे वर्णन करताना एक वेगळा शब्द किंवा अधिक शब्दाचा उपयोग करणे शक्य आहे.
  • संदर्भाच्या आधारावर, या शब्दाचे भाषांतर करण्याच्या पद्धतींमध्ये "पडद्यांचे आच्छादन" किंवा "आच्छादन" किंवा "जाड कपड्याचा एक भाग" किंवा "प्राण्यांच्या कातड्याचे आच्छादन" यांचा समावेश आहे.

(हे सुद्धा पहा: पवित्र स्थान, निवासमंडप, मंदिर)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: