mr_tw/bible/other/courtyard.md

4.6 KiB

चौक, चौकात, आंगण, आंगणात

व्याख्या:

"आंगण" आणि "चौक" हे शब्द, आकाशाकडे वर उघडे आणि सभोवताली भिंती असलेल्या जागेला सूचित करतात. "चौक" हा शब्द अशा जागेचा देखील संदर्भ देतो, जिथे न्यायाधीश लोक कायदेशीर आणि गुन्हेगारीची प्रकरणे ठरवतात.

  • निवासमंडप सभोवतालच्या अंगनाने वेढलेले होते, जे जाड कापडाच्या पडद्यांच्या बनवलेल्या भिंतींनी घेरलेले होते.
  • मंदिराच्या परिसरात तीन आतील आंगणे आहेत: एक याजकांसाठी, एक यहुदी पुरुषांसाठी, आणि एक यहुदी स्त्रियांसाठी.
  • ही आतील आंगणे कमी दगडी भिंतींनी वेढलेली होती, ज्यामुळे ती बाहेरच्या अंगणापासून वेगळी होत होती, जिथे परराष्ट्रीय लोकांना उपासना करण्याची परवानगी देण्यात आली होती.
  • घराचे आंगण हे घराच्या मध्यभागी असलेला एक खुला भाग होता.
  • "राजाचा चौक" या शब्दाचा संदर्भ त्याच्या राजवाड्याच्या किंवा राजवाड्यातील अशा जागेशी येऊ शकतो, जिथे बसून तो न्याय करत होता.
  • "यहोवाचा चौक" ही अभिव्यक्ति, यहोवाच्या आश्रयाचे किंवा ज्या ठिकाणी लोक यहोवाची उपासना करतात, त्या ठिकाणचा संदर्भ देण्याचा एक लाक्षणिक मार्ग आहे.

भाषांतर सूचना

  • "आंगण" या शब्दाचे भाषांतर "बंद केलेली जागा" किंवा "भिंतींच्या आतील जमीन" किंवा "मंदिराचे मैदान" किंवा "मंदिराची बंदिस्त जागा" असे केले जाऊ शकते.
  • काहीवेळा "मंदिर" हा शब्द "मंदिराचे आंगण" किंवा "मंदिराचा परिसर" असे करणे गरजेचे आहे, म्हणजे तिथे अंगणाचा संदर्भ देण्यात आला आहे, मंदिराच्या इमारतीचा नाही हे स्पष्ट होईल.
  • "यहोवाचा चौक" या अभिव्यक्तीचे भाषांतर "जिथे यहोवा राहतो" किंवा "यहोवाची उपासना करण्याची जागा" असे केले जाऊ शकते.
  • राजाचा चौक यासाठी वापरला जाणारा शब्द, यहोवाच्या चौकाचा संदर्भ देण्यासाठी देखील वापरला जाऊ शकतो.

(हे सुद्धा पहा: परराष्ट्रीय, न्यायाधीश, राजा, निवासमंडप, मंदिर)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: