mr_tw/bible/other/basket.md

2.7 KiB

टोपली, टोपल्या, टोपलीभर

व्याख्या:

"टोपली" या शब्दाचा संदर्भ विणलेल्या वस्तूपासून बनवलेल्या पात्राशी येतो.

  • पवित्र शास्त्राच्या काळात, टोपल्या या बऱ्याचदा मजबूत झाडाच्या वस्तूपासून विणलेल्या असत, जसे की, झाडाच्या फांदीपासून किंवा डहाळ्यापासून काढलेली लाकडाची साल.
  • एका टोपलीला जलरोधक पदार्थाने आच्छादित करण्यात येत असे, जेणेकरून ती पाण्यावर तरंगत रहिल.
  • जेंव्हा मोशे बालक होता, तेंव्हा त्याच्या आईने त्याला ठेवण्यासाठी एक जलरोधक टोपली बनवली, आणि ती टोपली नाईल नदीच्या लाव्हाळ्यामध्ये तरंगत राहिली.
  • या गोष्टीमध्ये "टोपली" म्हणून भाषांतरित केलेला शब्द, हा तोच शब्द आहे जो "तारू" म्हणून नोहाने बांधलेल्या जहाजाला संदर्भित करण्यासाठी भाषांतरित केलेला आहे. या दोन्ही संदर्भामधील ह्याच्या एकसारख्या उपयोगाचा अर्थ कदाचित "तरंगणारे पात्र" असा होतो.

(हे सुद्धा पहा: तारू, मोशे, नाईल नदी, नोहा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: