mr_tw/bible/names/rome.md

3.8 KiB
Raw Blame History

रोम, रोमी

तथ्य:

नवीन कराराच्या काळात, रोम हे शहर रोमी साम्राज्याचे केंद्र होते. आता ते सध्याचा आधुनिक देश इटलीची राजधानी आहे.

  • रोमी सम्राट, इस्राएलासाहित, भूमध्य सागराच्या भोवतालच्या सर्व प्रदेशांवर शासन करत होता.
  • "रोमी" या शब्दाचा संदर्भ त्या क्षेत्राशी संबंधित असलेले काहीही जे रोमी शासनाच्या नियंत्रणामध्ये आहे ह्याच्याशी आहे, त्यामध्ये रोमी नागरिक आणि रोमी अधिकारी ह्यांचा समावेश आहे.
  • प्रेषित पौलाला कैदी म्हणून रोम शहरात नेण्यात आले, कारण त्याने येशुबद्दलच्या सुवार्तेचा प्रचार केला होता.
  • नवीन करारातील रोमकरांस पत्र, हे पौलाने रोम मधील ख्रिस्ती लोकांना लिहिलेले पत्र आहे.

(हे सुद्धा पहाः सुवार्ता, समुद्र, पिलात, पौल)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 23:04 जेंव्हा बाळाचा जन्म होण्याचा समय जवळ आला, तेंव्हा रोमी सरकारने जनगणना करण्यासाठी आपापल्या गावी जाण्यास सांगितले.

  • 32:06 तेंव्हा येशूने दुष्टात्म्यास (अशुद्ध आत्म्यास, भुतास) विचारले, ‘‘तूझे नाव काय आहे? तो उत्तरला,‘‘माझे नाव सैन्य आहे, कारण आम्ही पुष्कळ आहोत. (‘‘लीजन’’ हा शब्द रोमी सेनेतील हजारो सैनिकांच्या गटासाठी होता)

  • 39:09 दुस-या दिवशी सकाळीच, यहूदी पुढा-यांनी येशूला रोमी सुभेदार पिलातासमोर आणले.

  • 39:12 रोमी सैनिकांनी येशूला फटके मारले, त्याच्या अंगावर एक राजकीय झगा घातला व डोक्यावर काटयांचा मुकुट ठेवला. मग ते त्याची थट्टा करु लागले, ‘‘पहा, हा यहूद्यांचा राजा!

  • Strong's: G4514, G4516