mr_tw/bible/kt/sonofgod.md

7.2 KiB
Raw Blame History

देवाचा पुत्र, पुत्र

तथ्य:

"देवाचा पुत्र" या शब्दाचा संदर्भ येशुशी आहे, देवाचा शब्द, जो मनुष्य बनून जगात आला. त्याला वारंवार "पुत्र" असेही संबोधले गेले.

  • देवाच्या पुत्राचा स्वभाव देवपित्यासारखाच आहे, आणि तो पूर्णपणे देव आहे.
  • देव पिता, देव पुत्र, आणि देव पवित्र आत्मा सर्व एक सार आहेत.
  • मानवी पुत्रांपेक्षा वेगळा, देवाचा पुत्र नेहमी अस्तित्वात आहे.
  • सुरुवातीला, देवाचा पुत्र पिता आणि पवित्र आत्मा यांच्यासह जगाची निर्मिती करण्यात सक्रिय होता.

कारण येशू देवाचा पुत्र आहे, म्हणून तो आपल्या पित्यावर प्रेम करतो आणि त्याच्या आज्ञांचे पालन करतो; आणि त्याचा पिता त्याच्यावर प्रेम करतो

भाषांतर सूचना

  • "देवाचा पुत्र" या शब्दासाठी स्वभाविकपणे "पुत्र" या मानवी मुलाचा संदर्भ देणाऱ्या शब्दासारखाच शब्द त्या भाषेतून भाषांतर करणे सर्वोत्तम आहे.
  • "पुत्र" या शब्दाचे भाषांतर करण्यासाठी वापरलेला शब्द "पिता" या शब्दाच्या भाषांतरास्ठी वापरलेल्या शब्दासह उचित बसत असल्याचे आणि हे शब्द सर्वात स्वाभाविक असून ते प्रकल्पित भाषेत एका खऱ्या पिता-पुत्राचा नातेसंबंध व्यक्त करतात हे सुनिश्चित करा.
  • "पुत्र" शब्द लिहिण्यास सुरू करण्याकरिता पहिले अक्षर मोठे वापरणे हे दर्शविते की तो देवाबद्दल बोलत आहे.
  • "पुत्र" हा शब्द "देवाचा पुत्र" या वाक्यांशापासून हृस्वीत केला गेला आहे, विशेषत: जेव्हा तो "पित्या" प्रमाणेच संदर्भित होतो.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: ख्रिस्त, पूर्वज, देव, देव पिता, पवित्र आत्मा, येशू, पुत्र, देवाचा पुत्र)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 22:05 देवदूताने स्पष्ट केले,‘‘पवित्र आत्मा तुझ्यावर येईल, आणि देवाचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करील. यास्तव ते बाळ पवित्र, देवाचा पुत्र असेल.

  • 24:09 देवाने योहानास सांगितले होते, ‘‘तू बाप्तिस्मा दिलेल्या ज्या व्यक्तिवर पवित्र आत्मा उतरुन येईल. तीच व्यक्ति देवाचा पुत्र असेल’’

  • 31:08 हे पाहून शिष्यांना मोठे आश्चर्य वाटले. त्यांनी येशूला नमन केले व म्हणाले, ‘‘तू खरोखर, देवाचा पूत्र आहेस.

  • 37:05 मार्थाने उत्तर दिले, ‘‘होय,प्रभुजी! आपण देवाचे पुत्र मशीहा आहात असा मी विश्वास धरिते’’

  • 42:10 म्हणून, तुम्ही जा व सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य बनवा आणि पिता, पुत्र व पवित्र आत्माच्या नावाने त्यांना बाप्तिस्मा द्या, आणि मी आज्ञापिलेल्या सर्व गोष्टी त्यांना पाळावयास शिकवा.

  • 46:06 लगेच शौल दिमिष्कामध्ये असणाऱ्या यहूद्यांना प्रचार करू लागला व म्हणाला, "येशू हाच देवाचा पुत्र आहे."

  • 49:09 परंतु देवाने जगातील प्रत्येक मनुष्यावर एवढी प्रिती केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याजवर विश्वास ठेवितो येशू त्याला त्याच्या पापांची शिक्षा देणार नाही, पण देवाबरोबर सदासर्वकाळ राहील.

  • Strong's: H426, H430, H1121, H1247, G2316, G5207