mr_tw/bible/kt/pray.md

6.0 KiB

प्रार्थना करणे, प्रार्थना

व्याख्या:

“प्रार्थना करणे” आणि “प्रार्थना” या शब्दाचा अर्थ देवासोबत बोलणे होय. या शब्दाचा उपयोग खोट्या देवाशी बोलण्याचा प्रयत्न करणार्‍या लोकांना संदर्भित करण्यासाठी केला जातो.

  • लोक शांतपणे प्रार्थना करून, त्यांच्या विचारांसह देवाशी बोलू शकतात किंवा त्यांच्या आवाजाने देवाशी मोठ्याने बोलू शकतात. कधीकधी प्रार्थना लिहून ठेवल्या जातात, जसे की दाविदाने स्तोत्रांच्या पुस्तकात त्याच्या प्रार्थना लिहिल्या.
  • प्रार्थनेत देवाकडे दया मागणे, एखाद्या समस्येबद्दल मदत मागणे आणि निर्णय घेण्यास शहाणपणा मागणे यांचा समावेश असू शकतो.
  • बर्‍याचदा लोक आजारी असलेल्यांना किंवा इतर गोष्टीसांठी त्याच्या मदतीची गरज असलेल्या लोकांना बरे करण्याची प्रार्थना करतात.
  • जेव्हा लोक देवाला प्रार्थना करतात तेव्हा त्याचे आभार आणि स्तुतीसुद्धा करतात.
  • प्रार्थनेमध्ये देवाकडे आपल्या पापांची कबुली करणे आणि त्यानी आम्हास क्षमा करावे यासाठी मागण्याचे समविष्ट असते.
  • जेव्हा आपला आत्मा त्याच्या आत्म्याद्वारे त्याच्याशी संवाद साधत असतो, आपल्या भावना विभागतो आणि त्याच्या उपस्थितीचा आनंद घेतो तेव्हा देवाशी बोलण्याला कधीकधी त्याच्याशी “संवाद साधणे” म्हटले जाते.
  • या शब्दाचे भाषांतर “देवाशी बोलणे” किंवा “देवाशी संवाद साधणे” असे केले जाऊ शकते. या शब्दाचे भाषांतर मुक प्रार्थनेचा देखिल समावेश करण्यास सक्षम असावे.

(हे देखील पाहा: [खोटे देव], [क्षमा करणे], [स्तुती])

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

  • [1थेस्सलनीकाकरांस पत्र 03:09]
  • [प्रेषितांचे कृत्ये 08:24]
  • [प्रेषितांचे कृत्ये 14:26]
  • [कलस्सैकरांस पत्र 04:04]
  • [योहान 17:09]
  • [लूक 11:1]
  • [मत्तय 05:43-45]
  • [मत्तय 14:22-24]

पवित्र शास्त्राच्या कथांतील उदाहरणे:

  • [06:05] इसहाकाने रिबकेसाठी प्रार्थना केली आणि देवाने तिला जुळ्या बाळांची गर्भधारणा करण्यास परवानगी दिली.
  • [13:12] परंतु मोशेने त्यांच्यासाठी प्रार्थना केली, आणि देवाने त्याची प्रार्थना ऐकली व त्यांचा नाश केला नाही.
  • __ [19:08] __ त्यानंतर बालाच्या संदेष्ट्यांनी बालाला प्रार्थना केली, "हे बाल, आमचे ऐक! "
  • [21:07] याजकांनी देखील लोकांसाठी देवाला प्रार्थना केली.
  • [38:11] येशूने आपल्या शिष्यांना त्यांनी मोहात पडू नये म्हणून प्रार्थना करण्यास सांगितले.
  • [43:13] शिष्यांनी प्रेषितांची शिकवण सतत ऐकली, एकत्र वेळ घालवला, एकत्र भोजन केले, आणि एकमेकांबरोबर प्रार्थना केल्या.
  • [49:18] देव तुम्हाला त्याच्या वचनाचा अभ्यास करण्यासाठी, इतर विश्वासणाऱ्याबरोबर त्याची उपासना करण्यासाठी आणि त्याने आपल्यासाठी काय केले हे इतरांना सांगण्यासाठी प्रार्थना करण्यास सांगतो

शब्द संख्या:

  • स्ट्रॉन्गचे: एच 559, एच 577, एच 1156, एच 2470, एच 3908, एच 4994, एच 6279, एच 6419, एच 6739, एच 7878, एच 7818, एच 8034