mr_tw/bible/kt/peopleofgod.md

4.6 KiB

देवाचे लोक, माझे लोक

व्याख्या:

"देवाचे लोक" या शब्दाचा संदर्भ लोकांशी आहे, ज्यांना देवाने जगातून बाहेर अश्यासाठी बोलावले आहे की, ते त्याच्याबरोबर एक विशेष संबंध स्थापन करू शकतील.

  • जेंव्हा देव म्हणतो "माझे लोक," तेंव्हा तो अशा लोकांबद्दल बोलत असतो, ज्यांना त्याने निवडले आहे आणि ज्यांचा त्याच्याशी संबंध आहे.
  • देवाचे लोक हे त्याच्यासाठी निवडलेले आहेत आणि जगासून वेगळे अश्यासाठी केलेले आहेत की, ते त्याला प्रसन्न करणारे जीवन जगू शकतील. * तो त्यांना त्याची मुले म्हणून सुद्धा संबोधतो.
  • जुन्या करारामध्ये, "देवाचे लोक" ह्याचा संदर्भ इस्राएलच्या राष्ट्राशी आहे, ज्याला देवाने निवडले होते आणि त्याची सेवा करण्यासाठी आणि आज्ञा पाळण्यासाठी जगातील इतर राष्ट्रातून त्यांना वेगळे केले होते.
  • नवीन करारामध्ये, "देवाचे लोक" ह्याचा संदर्भ विशेषकरून सर्व लोकांशी आहे, जे येशूवर विश्वास ठेवतात आणि त्यांना मंडळी असे म्हणतात. ह्यामध्ये दोन्हींचा यहुदी आणि अन्यजातींचा समावेश होतो.

भाषांतर सूचना

  • "देवाचे लोक" या शब्दाचे भाषांतर "देवाचे लोक" किंवा "देवाची उपासना करणारे लोक" किंवा "देवाची सेवा करणारे लोक" किंवा "जे लोक देवाचे आहेत" असे केले जाते.
  • जेंव्हा देव म्हणतो "माझे लोक" तेंव्हा, ह्याचे भाषांतर करण्याच्या इतर पद्धतींमध्ये "मी निवडलेले लोक" किंवा "माझी उपासना करणारे लोक" किंवा "जे लोक माझे आहेत" या शब्दांचा समावेश होतो.
  • त्याचप्रमाणे, "तुझे लोक" ह्याचे भाषांतर "जे लोक तुझे आहेत" किंवा "तुझे होण्यासाठी तू निवडलेले लोक" असे देखील केले जाऊ शकते.
  • तसेच, "त्याचे लोक" ह्याचे भाषांतर "जे लोक त्याचे आहेत" किंवा "देवाने त्याचे होण्यासाठी निवडलेले लोक" असे देखील केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: इस्राएल, लोकसमूह)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: