mr_tw/bible/kt/good.md

8.8 KiB

चांगले, बरोबर, आनंददायी, सुखकारक, चांगले, सर्वोत्कृष्ट

व्याख्या:

"चांगला" या शब्दाचे संदर्भानुसार भिन्न अर्थ आहेत. या भिन्न अर्थांचे भाषांतर करण्यासाठी बर्‍याच भाषा भिन्न शब्दांचा वापर करतील.

  • सर्वसाधारणपणे, एखादी गोष्ट देवाचे वैशिष्ट, हेतू आणि इच्छेनुसार बसत असेल तर ती चांगली आहे.
  • काहीतरी जे "चांगले" आहे ते सुखकारक, उत्कृष्ट, उपयुक्त,

सोयीस्कर, फायदेशीर किंवा नैतिकदृष्ट्या योग्य असू शकते

  • जमीन जी “चांगली” आहे तीला “सुपिक” किंवा "उत्पादक" असे म्हटले जावू शकते.
  • “चांगले” पीक हे “भरपूर” पीक असू शकते.
  • एखादी व्यक्ती आपल्या कामावर किंवा व्यवसायात कुशल असेल तर ते काय करतात त्याबद्दल "चांगले" असू शकतात, जसे की "एक चांगला शेतकरी."
  • पवित्र शास्त्रात “चांगला” या शब्दाच्या सामान्य अर्थाचा बर्‍याचदा “वाईट” या शब्दाबरोबर फरक केला जातो.
  • “चांगुलपणा” ही संज्ञा सामान्यतः विचार आणि कृतीमध्ये नैतिकदृष्ट्या चांगला किंवा नितीमान असणे याला संदर्भित करते.
  • देवाचा चांगुलपणा तो लोकांना चांगल्या आणि फायद्याच्या गोष्टी देऊन कसा आशीर्वादित करतो याला संदर्भित करतो. हे त्याच्या नैतिक परिपूर्णतेला देखील संदर्भित करु शकते.

भाषांतरातील सुचना:

  • लक्ष्य भाषेमध्ये "चांगल्या" या संज्ञेसाठी सामान्य शब्द जेथे वापरला जातो तेथे हा सामान्य अर्थ अचूक आणि नैसर्गिक असवा, विशेषत: संदर्भात जिथे त्याची तुलना वाईटाशी केली जाते.
  • संदर्भानुसार, हा शब्द भाषांतरित करण्याच्या इतर मार्गांमध्ये “दयाळू” किंवा “उत्कृष्ट” किंवा “देवाला संतुष्ट” किंवा “नीतिमान” किंवा “नैतिकदृष्ट्या सरळ” किंवा “फायदेशीर” हे वाक्यांश समाविष्ट केले जाऊ शकते.
  • “चांगली जमीन” हे “सुपिक जमीन” किंवा “उत्पादक जमीन” असे भाषांतरित केले जाऊ शकते; एक "चांगले पीक" हे “भरपूर पीक" किंवा "मोठ्या प्रमाणातील हंगाम" असे भाषांतरित केले जाऊ शकते
  • “चांगले करा” या शब्दाचा अर्थ असा आहे की असे काहीतरी करणे जे दुसऱ्यांना फायदेशीर ठरेल आणि "दयाळूपणा" किंवा एखाद्याला "मदत" किंवा "फायदा" असे भाषांतरित केले जाऊ शकते.
  • “शब्बाथ दिवशी चांगले करणे” म्हणजे “शब्बाथ दिवशी इतरांना मदत करणारी कामे” करणे.
  • संदर्भानुसार, “चांगुलपणा” या शब्दाचा अनुवाद करण्याच्या मार्गांमध्ये “आशीर्वाद” किंवा “दयाळूपणा” किंवा “नैतिक परिपूर्णता” किंवा “नीतिमत्त्व” किंवा “शुद्धता” यांचा समावेश असू शकतो.

(हे देखील पाहा: [वाईट], [पवित्र], [फायदा], [नीतिमान])

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

  • [गलतीकरांस पत्र 05:22-24]
  • [उत्पत्ती 01:12]
  • [उत्पत्ती 02:09]
  • [उत्पत्ती 2:17]
  • [याकोब 03:13]
  • [रोमकरांस पत्र 02:04]

पवित्र शास्त्राच्या कथांतील उदाहरणे:

  • [01:04] देवाने पाहिले की त्याने जे तयार केले ते म्हणजे __ चांगले__आहे.
  • [01:11] देवाने __ चांगले__ आणि वाईटाचे ज्ञान देणारे झाड लावले!"
  • [01:12] मग देव म्हणाला, “मनुष्याने एकटे असावे हे __ चांगले__ नाही.”
  • [02:04] "देवाला हे माहिती आहे की तुम्ही हे खाल्ल्याबरोबरच तुम्ही देवासारखे व्हाल आणि त्याच्यासारखे __ चांगले__ आणि वाईट समजू शकाल."
  • [08:12] “जेव्हा तुम्ही मला गुलाम म्हणून विकले तेव्हा तुम्ही वाईट गोष्टी करण्याचा प्रयत्न केला परंतु देवाने वाईटाचा उपयोग चांगल्यासाठी केला!”
  • [14:15] यहोशवा एक चांगला पुढारी होता कारण तो स्थिर असे आणि देवाची आज्ञा पाळत असे.
  • [18:13] यातील काही राजे चांगली माणसे होती ज्यांनी न्यायाने राज्य केले आणि देवाची उपासना केली.
  • [28:01]चांगले शिक्षक, अनंतकाळचे जीवन मिळविण्यासाठी मी काय करावे? ” येशू त्याला म्हणाला, “तू मला‘ __ चांगला__ ’असे का म्हणतोस? चांगला फक्त एकच आहे, आणि तो देव आहे. ”

शब्द संख्या:

  • स्ट्रॉन्गचे: एच117, एच145, एच155, एच202, एच239, एच410, एच1580, एच1926, एच1935, एच2532, एच2617, एच2623, एच2869, एच2895, एच2896, एच2898, एच3190, एच3191, एच3276, एच3474, एच3788, एच3966, एच4261, एच4399, एच5232, एच5750, एच6287, एच6643, एच6743, एच7075, एच7368, एच7399, एच7443, एच7999, एच8231, एच8232, एच8233, एच8389, एच8458, जी14, जी15, जी18, जी19, जी515, जी744, जी865, जी979, जी1380, जी2095, जी2097, जी2106, जी2107, जी2108, जी2109, जी2114, जी2115, जी2133, जी2140, जी2162, जी2163, जी2174, जी2293, जी2565, जी2567, जी2570, जी2573, जी2887, जी2986, जी3140, जी3617, जी3776, जी4147, जी4632, जी4674, जी4851, जी5223, जी5224, जी5358, जी5542, जी5543, जी5544