mr_tw/bible/kt/forsaken.md

30 lines
4.4 KiB
Markdown

# सोडणे, सोडला, त्याग केला, त्यागले
## व्याख्या:
"सोडणे" या शब्दाचा अर्थ एखाद्याचा त्याग करणे किंवा काहीतरी सोडून देणे असा होतो. असा कोणीतरी ज्याचा "त्याग केला" आहे, दुसऱ्या एखाद्याने त्याला सोडलेले आहे किंवा त्याचा त्याग केला आहे.
* जेंव्हा लोक देवाला "सोडतात" तेंव्हा ते त्याची आज्ञा न पाळता त्याच्याशी अविश्वासू असतात.
* जेंव्हा देव लोकांना "सोडतो," तेंव्हा तो त्यांची मदत करण्याची थांबवतो आणि त्यांना त्याच्याकडे परत वळवून आणण्यासाठी त्यांना त्रासाचा अनुभव करण्यास परवानगी देतो.
* या शब्दाचा अर्थ वस्तूंना सोडणे असा देखील होतो, जसे की, देवाच्या शिक्षणाचा त्याग करणे किंवा त्याचे अनुसरण न करणे.
* "त्याग केलेला" हा शब्द भूतकाळी रूप म्हणून वापरले जाऊ शकते, जसे की, "त्याने तुझा त्याग केला" किंवा अशा एखाद्याला संदर्भित करणे ज्याचा "त्याग केला आहे."
## भाषांतर सूचना
* या शब्दाचे भाषांतर करण्याच्या इतर पद्धतींमध्ये "त्याग करणे" किंवा "दुर्लक्ष करणे" किंवा "सोडून देणे" किंवा "च्या पासून दूर जाणे" किंवा "मागे सोडणे" ह्यांचा संदर्भाच्या आधारावर समावेश होतो.
* देवाच्या नियमांना "सोडणे" ह्याचे भाषांतर "देवाच्या नियमांची अवज्ञा करणे" असे केले जाऊ शकते. ह्याचे भाषांतर त्याच्या शिकवणींचा किंवा त्याच्या नियमांचा "त्याग करणे" किंवा "सोडून देणे" किंवा "आज्ञा पालन करण्याचे थांबवणे" असे देखील केले जाऊ शकते.
* "त्याग केलेला असणे" या वाक्यांशाचे भाषांतर "त्यागलेला असणे" किंवा "सोडून दिलेले असणे" असे देखील होऊ शकते.
* मजकूर एखाद्या वस्तूला किंवा एखाद्या व्यक्तीला सोडून देण्याचे वर्णन करतो, या संदर्भाच्या आधारावर, या शब्दाचे भाषांतर करण्यासाठी वेगवेगळ्या शब्दांचा उपयोग करणे अधिक स्पष्ट करेल.
# पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [1 राजे 06:11-13](rc://*/tn/help/1ki/06/11)
* [दानीएल 11:29-30](rc://*/tn/help/dan/11/29)
* [उत्पत्ति 24:26-27](rc://*/tn/help/gen/24/26)
* [यहोशवा 24:16-18](rc://*/tn/help/jos/24/16)
* [मत्तय 27:45-47](rc://*/tn/help/mat/27/45)
* [नीतिसूत्रे 27:9-10](rc://*/tn/help/pro/27/09)
* [स्त्रोत 071:17-18](rc://*/tn/help/psa/071/017)
* Strong's: H488, H2308, H5203, H5428, H5800, H5805, H7503, G646, G657, G863, G1459, G2641,