mr_tw/bible/kt/foolish.md

3.9 KiB

मूर्ख, मूर्खता, मूर्खपणा

व्याख्या:

“मूर्ख” हा शब्द अश्या व्यक्तीला संदर्भित करतो जो नेहमी चुकीची निवड करतो, विशेषत: जेव्हा तो आज्ञा न पाळण्याची निवड करतो. “मूर्खता” ही संज्ञा शहाणा नसणाऱ्या व्यक्तीचे किंवा वर्तवणूचे वर्णन करते.

पवित्र शास्त्रामध्ये “मूर्ख” हा शब्द सहसा अशा व्यक्तीला सूचित करतो जो देवावर विश्वास ठेवत नाही किंवा त्याच्या आज्ञा पाळत नाही. हे बर्‍याचदा शहाण्या माणसापेक्षा भिन्न आहे, जो देवावर विश्वास ठेवतो आणि देवाची आज्ञा पाळतो.

  • स्तोत्रात, दाविदाने एका मूर्खाचे वर्णन असे केले आहे जो देवावर विश्वास ठेवत नाही, जो देवाच्या सृष्टीतील सर्व पुराव्याकडे दुर्लक्ष करतो.
  • जुन्या करारातील नीतिसूत्रेच्या पुस्तकात देखील एक मूर्ख किंवा मूर्ख माणूस कसा असतो याबद्दल बरेच वर्णन केलेले आहे.
  • “मूर्खपणा” ही संज्ञा शहाणपणाची नसणाऱ्या कृतीला संदर्भित करते कारण ती देवाच्या इच्छेविरुद्ध आहे. बर्‍याचदा “मूर्खपणा” या संज्ञेमध्ये वेडगळ किंवा धोकादायक अशा गोष्टीचा अर्थ देखील असतो.

भाषांतरातील सुचना:

  • “मूर्ख” या संज्ञेचे भाषांतर “मूर्ख मनुष्य” किंवा “वेडगळा मनुष्य” किंवा “बेसावध मनुष्य” किंवा “अधार्मिक मनुष्य” असे केले जाऊ शकते.
  • “मूर्ख” भाषांतरित करण्याच्या मार्गांमध्ये “समजदारपणाचा अभाव” किंवा “वेडगळा” किंवा “बेसावध” याचा समावेश असू शकतो.

(हे देखिल पाहा: [शहाणे])

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

  • [उपदेशक 01:17]
  • [इफिसकरांस पत्र 05:15]
  • [गलतीकरांस पत्र03:03]
  • [उत्पत्ती 31:28]
  • [मत्तय 07:26]
  • [मत्तय 25:08]
  • [नीतिसुत्रेs 13:16]
  • [स्तोत्र 049:13]

शब्द संख्या:

  • स्ट्रॉन्गचे: एच191, एच196, एच200, एच1198, एच1984, एच2973, एच3684, एच3687, एच3688, एच3689, एच3690, एच5014, एच5034, एच5036, एच5039, एच5528, एच5529, एच5530, एच5531, एच6612, एच8417, एच8602, एच8604, जी453, जी454, जी781, जी801, जी877, जी878, जी2757, जी3150, जी3154, जी3471, जी3472, जी3473, जी3474, जी3912