mr_tw/bible/kt/filled.md

4.1 KiB

पवित्र आत्म्याने पूर्ण होणे

व्याख्या:

"पवित्र आत्म्याने पूर्ण होणे" हा शब्द एक लाक्षणिक अभिव्यक्ती आहे, ज्याचा उपयोग जेंव्हा एखाद्या मनुष्याचे वर्णन करतो, ह्याचा अर्थ पवित्र आत्मा त्या मनुष्याला देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याचे सशक्तीकरण करतो.

अभिव्यक्ती "पूर्ण होणे" ही एक अभिव्यक्ती आहे जिचा सहसा अर्थ "च्या द्वारे नियंत्रित" असा होतो.

  • जेंव्हा लोक पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने चालतात आणि देवाची त्यांच्या जीवानामधून जी इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी ते पूर्णपणे त्याच्यावर अवलंबून राहतात, तेंव्हा ते "पवित्र आत्म्याने भरले जातात."

भाषांतर सूचना

  • या शब्दाचे भाषांतर "पवित्र आत्म्याद्वारा सशक्तीकरण" किंवा "पवित्र आत्म्याद्वारा नियंत्रित" असे केले जाऊ शकते. पवित्र आत्मा एखाद्या व्यक्तीला काहीतरी करण्यास भाग पाडत आहे, ह्याचा असा भास होता कामा नये.
  • "तो पवित्र आत्म्याने भरला" या वाक्याचे भाषांतर "तो पूर्णपणे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने जगत होता" किंवा "त्याला पूर्णपणे पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन मिळत होते" किंवा "पवित्र आत्मा पूर्णपणे त्याचे मार्गदर्शन करत होता" असे केले जाऊ शकते.
  • हा शब्द "पवित्र अत्म्याद्वारा राहणे" या अभिव्यक्तीच्या अर्थाच्या समानअर्थाचा आहे, पण "पवित्र आत्म्याने भरलेला" हा पुर्णत्वावर भर देतो, जिथे एखादा व्यक्ती पवित्र आत्म्याला त्याच्यावर नियंत्रण करण्याची किंवा त्याच्या आयुष्यावर प्रभाव टाकण्याची परवानगी देतो. शक्य असल्यास, या दोन अभिव्यक्तींचे वेगळे भाषांतर करणे आवश्यक आहे.

(हे सुद्धा पहाः पवित्र आत्मा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: