mr_tw/bible/kt/exhort.md

3.0 KiB

उत्तेजन देणे, उत्तेजन

व्याख्या:

“उत्तेजन” या शब्दाचा अर्थ एखाद्याला योग्य ते करण्यास उद्युक्त करणे आणि आग्रह करणे होय. अशा प्रोत्साहनास “उत्तेजन” म्हणतात.

  • इतरांना पाप टाळण्यासाठी आणि देवाच्या इच्छेचे अनुसरण करण्यासाठी परावृत्त करणे हा उत्तेजनाचा उद्देश आहे.
  • नवीन करार ख्रिस्ती लोकांना कठोरपणे किंवा तुसडी वागणूकीने नव्हे तर एकमेकांना प्रेमाने बोध करण्यास शिकवतो.

भाषांतरातील सूचना:

  • संदर्भानुसार, “उत्तेजन” याचे भाषांतर “अति आग्रह” किंवा “राजी करणे” किंवा “सल्ला देणे” असे देखील केले जाऊ शकते.
  • या शब्दाच्या भाषांतरात उत्तेजन देणारा रागात आहे असे सुचित करत नाही याची खात्री करा. या शब्दामध्ये सामर्थ्य आणि गंभीरता दर्शविली पाहिजे, परंतु संतापलेल्या भाषणाचा संदर्भ घेऊ नये.
  • बर्‍याच संदर्भांमध्ये, “उत्तेजन” या शब्दाचे भाषांतर “प्रोत्साहित” करण्यापेक्षा वेगळे केले पाहिजे, याचा अर्थ एखाद्याला प्रेरणा देणे, धीर देणे किंवा सांत्वन देणे होय.
  • सामान्यत: या शब्दाचे भाषांतर “बोध करणे” यापेक्षाही वेगळे केले जाईल. म्हणजे एखाद्याला त्याच्या चुकीच्या वागण्याबद्दल चेतावणी देणे किंवा सुधारणे होय.

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

  • [1 थेस्सलनीकरांस पत्र 02:3-4]
  • [1 थेस्सलनीकरांस पत्र 02:12]
  • [1 तिमथ्यी 05:02]
  • [लूक 03:18]

शब्द संख्या:

  • स्ट्रॉन्गचे: जी3867, जी3870, जी3874, जी4389