6.8 KiB
शुभवार्ता, सुवार्ता (सुसमाचार)
# व्याख्या:
"सुवार्ता" या शब्दाचा शब्दशः अर्थ "शुभवार्ता" असा होतो, आणि त्याचा संदर्भ लोकांना सांगणे की, काहीतरी त्यांच्या फायदेशीर आहे आणि त्यांना ते आनंदित करते हा संदेश किंवा घोषणा करण्याशी आहे.
- पवित्र शास्त्रामध्ये, या शब्दाचा संदर्भ सहसा, येशूच्या वधस्तंभावरील बलीदानाद्वारे देवाचा लोकांच्या तारणाचा संदेश देण्याशी आहे.
- बऱ्याच इंग्रजी पवित्र शास्त्रामध्ये, "शुभवार्ता" ह्याचे भाषांतर सहसा "सुवार्ता" असे केले आहे, आणि ते अशा वाक्यांशामध्ये वापरले आहे, जसे की, "येशू ख्रिस्ताची सुवार्ता," "देवाची सुवार्ता" आणि "राज्याची सुवार्ता."
# भाषांतर सूचना
- या शब्दाचे भाषांतर करण्याच्या इतर पद्धतींमध्ये, "शुभ संदेश" किंवा "शुभ घोषणा" किंवा "देवाचा तारणाचा संदेश" किंवा "येशुबद्दल चांगल्या गोष्टी ज्या देव आपल्याला शिकवतो" यांचा समावेश होतो.
- संदर्भाच्या आधारावर, "ची शुभवार्ता" या वाक्यांशाचे भाषांतर "च्या बद्दल शुभवार्ता/संदेश" किंवा "च्या कडून शुभ संदेश" किंवा "च्या बद्दलच्या चांगल्या गोष्टी ज्या देव आपणाला सांगतो" किंवा "त्याने कसे लोकांना वाचवले ह्याबद्दल देव काय सांगतो" ह्याचा समावेश होतो.
(हे सुद्धा पहाः राज्य, बलिदान, तारण)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
- 1 थेस्सलनीकाकरांस पत्र 01:4-5
- प्रेषितांची कृत्ये 08:25
- कलस्सैकरांस पत्र 01:21-23
- गलतीकरांस पत्र 01:6-7
- लुक 08:1-3
- मार्क 01:14-15
- फिलीपैकरास पत्र 02:22-24
- रोमकरास पत्र 01:1-3
# पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:
-
23:06 देवदूत म्हणाला, ‘‘भिऊ नका, कारण मी तुम्हासाठी मोठी आनंदाची बातमी घेऊन आलो आहे. आज बेथलेहेम नगरामध्ये तुमच्यासाठी मसिहा, अर्थात प्रभू जन्मला आहे!’’
-
26:03 येशूने वाचले,‘‘परमेश्वराने त्याचा आत्मा मला दिला आहे, ते अशासाठी की गरीबांस सुवार्ता सांगावी, धरुन नेलेल्यांची सुटका व आंधळ्यास पुन्हा दृष्टिचा लाभ व्हावा व ठेचले जात आहेत त्यांस सोडवुन पाठवावे हयाची घोषणा करावी. * परेमश्वराच्या कृपा प्रसादाच्या वर्षाची घोषणा करावी’’
-
45:10 फिलिप्पाने अन्य शास्त्रपाठातूनही संदर्भ घेऊन त्यास येशूविषयीची सुवार्ता सांगितली.
-
46:10 आणि मग त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी येशूची सुवार्ता सांगण्यासाठी त्यांना पाठविले.
-
47:01 एके दिवशी पौल आणि त्याचा मित्र सीला हे फिलिप्पै नगरामध्ये येशूची सुवार्ता सांगण्यासाठी गेले.
-
47:13 येशूविषयीची सुवार्ता पसरत गेली व मंडळीची वाढ होत गेली.
-
50:01 सुमारे 2000 वर्षांपासून सर्व जगात अधिक आणि अधिक लोक येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेविषयी ऐकत आहेत.
-
50:02 येशू या पृथ्वीवर असतांना म्हणाला, "माझे शिष्य देवाच्या राज्याची सुवार्ता संपुर्ण जगामध्ये गाजवतील, तेव्हा शेवट होईल."
-
50:03 स्वर्गात जाण्यापुर्वी येशूने ख्रिस्ती लोकांना सांगितले की, ज्या लोकांनी कधीच सुवार्ता ऐकली नाही त्यांना जाऊन सांगा.
-
Strong's: G2097, G2098, G4283