mr_tw/bible/kt/command.md

3.6 KiB

आज्ञा (आदेश), आज्ञापिले

# व्याख्या:

"आज्ञा" या शब्दाचा अर्थ एखाद्याला एखादी गोष्ट करण्यासाठी आदेश देणे असा होतो. एक "आदेश" किंवा "आज्ञा" हे असे काहीतरी आहे ज्याला एखाद्या व्यक्तीला करावयास सांगितले जाते.

  • जरी या साज्ञांचा समान अर्थ असला तरी, "आज्ञा" ह्याचा सहसा संदर्भ देवाच्या विशिष्ठ आज्ञा ह्याच्याशी येतो, ज्या अधिक औपचारिक आणि कायमस्वरूपी आहेत, जसे की, "दहा आज्ञा."
  • एक आज्ञा ही सकारात्मक ("आपल्या आई वडिलांचा सन्मान कर") किंवा नकारात्मक ("चोरी करू नको") असू शकते.
  • "आज्ञा घेणे" ह्याचा अर्थ एखाद्या गोष्टीचा किंवा व्यक्तीचा "नियंत्रण घेणे" किंवा "कश्याचा तरी भर घेणे"

# भाषांतर सूचना

  • या शब्दाचे भाषांतर "कायदा" या शब्दापेक्षा वेगळे करणे सर्वोत्तम राहील. त्याचप्रमाणे, ह्याची तुलना "आदेश" आणि "कायदा" ह्यांच्या व्याख्येशी करा.
  • काही भाषांतर करणारे, "आदेश" आणि "आज्ञा" या दोन्ही शब्दांचे त्यांच्या भाषेत भाषांतर एकाच शब्दाने करण्यास प्राधान्य देऊ शकतात.
  • इतर भाषा कदाचित आज्ञा ह्याच्यासाठी विशेष शब्दाचा उपयोग करू शकतात, ज्याचा संदर्भ देवाने बनवलेल्या शेवटपर्यंत राहणाऱ्या औपचारिक अज्ञांशी येतो.

(हे सुद्धा पहा: आदेश, कायदा, नियम दहा आज्ञा)

# पवित्र शास्त्रातील संदर्भ: