mr_tw/bible/kt/children.md

5.5 KiB

मुले, मुल

# व्याख्या:

पवित्र शास्त्रामध्ये, "मुल" हा शब्द सहसा, कोणीतरी असा जो वयाने लहान आहे त्याच्यासाठी सामान्यपणे संदर्भित केला आहे, ज्यामध्ये लहान बालकांचा देखील समावेश आहे. "मुले" हा शब्द अनेकवचनी स्वरूपाचा आहे, आणि त्याचे अनेक अलंकारिक उपयोग सुद्धा आहेत.

  • पवित्र शास्त्रामध्ये, शिष्यांना किंवा अनुयायांना काहीवेळा "मुले" म्हणून संबोधण्यात आले आहे.

  • बऱ्याचदा "मुले" हा शब्द, एखाद्या मनुष्याच्या वंशजांना संदर्भित करण्यासाठी वापरला जातो.

  • "ची मुले" या वाक्यांशाचा संदर्भ एखाद्या विशिष्ठ व्यक्तीच्या चारित्र्य गुणांशी आहे. याची काही उदाहरणे अशी असतील:

  • प्रकाशाची मुले

  • आज्ञाधारक मुले

  • सैतानाची मुले

  • या शब्दाचा संदर्भ अशा लोकांशी देखील होऊ शकतो, जो आत्मिक मुलांसारखे आहेत. उदाहरणार्थ, "देवाची मुले" ह्याचा संदर्भ अशा लोकांशी आहे, जे येशुवरील विश्वासाच्या द्वारे देवाची आहेत.

# भाषांतर सूचना

  • जेंव्हा ह्याचा संदर्भ एखाद्या व्यक्तीच्या नातवंडांना किंवा नातवंडांच्या नातवंडांना इत्यादींशी येतो, तेंव्हा "मुले" या शब्दाचे भाषांतर "वंशज" असे केले जाऊ शकते.
  • संदर्भाच्या आधारावर, "ची मुले" ह्याचे भाषांतर, "असे लोक जे त्या चारित्र्य गुणांचे आहेत" किंवा "जे लोक त्या सारखे वागतात" असे केले जाऊ शकते.
  • शक्य असल्यास "देवाची मुले" या वाक्यांशाचे भाषांतर शब्दशः करायला हवे, कारण हा एक पवित्र शास्त्राचा महत्वाचा विषय आहे की, देव आमचा स्वर्गीय पिता आहे. ह्याच्या भाषांतराचा संभाव्य पर्याय "देवाचे लोक" किंवा "देवाची आत्मिक मुले" असा असू शकतो.
  • जेंव्हा येशूने त्याच्या शिष्यांना "मुले" म्हंटले, ह्याचे भाषांतर "प्रिय मित्रांनो" किंवा "माझ्या प्रिय शिष्यांनो" असे देखील केले जाऊ शकते.
  • जेंव्हा पौल आणि योहान येशुंच्या विश्वासणाऱ्यांना "मुले" म्हणून संदर्भित करतात, तेंव्हा ह्याचे भाषांतर "प्रिय सह विश्वासी" असे केले जाऊ शकते.
  • "वचनाची मुले" या वाक्यांशाचे भाषांतर, "देवाने जे वचन दिलेले ते मिळालेले लोक" असे केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: वंशज, वचन, मुलगा, आत्मा, विश्वास, प्रिय)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: