mr_tw/bible/other/yeast.md

5.5 KiB

किण्व, खमीर, फुगवणे, फुगून जाणे, बेखमीर

व्याख्या:

"खमीर" हा एक सामान्य शब्द आहे, जो पिठाच्या कणकेला फुगण्यासाठी आणि वाढण्यासाठी कारणीभूत ठरतो. "किण्व" हे विशिष्ठ प्रकारचे खमीर आहे.

  • काही इंग्रजी भाषांतरामध्ये, खमीर या शब्दाला "किण्व" म्हणून भाषांतरित केले आहे, हा एक आधुनिक खामीराचे साधन आहे, जो पिठाच्या कणकेला ती भाजण्याच्या अगोदर हवेच्या बुड्बुड्यांनी भरून तो कणकेला फुगवतो. किण्वला कणिक मळताना घालतात, म्हणजे तो संपूर्ण कणकेच्या गोळ्यात सगळीकडे पसरतो.
  • जुन्या कराराच्या काळात, कणकेच्या गोळ्याला काही काळासाठी तसेच ठेवून त्यामध्ये अंबवण्याचे किंवा फुगण्याचे साधन उत्पादित केले जात असे. आगोदर मळलेल्या पीठातील थोडेसे पीठ बाजूला काढून ठेवून, ते नंतर मळल्या जाणाऱ्या पीठासाठी खमीर म्हणून उपयोगात आणले जात होते.
  • जेंव्हा इस्राएल लोक मिसरमधून बाहेर पडले, त्यांच्याकडे कणिक फुगेपर्यंत वाट बघायला वेळ नव्हता, म्हणून त्यांनी प्रवासाला निघताना त्यांच्याबरोबर खमीर न घातलेल्या भाकरी बनवून घेतल्या. ह्याची आठवण म्हणून, प्रत्येक वर्षी यहुदी लोक बेखमीर भाकरी खाऊन वल्हांडणाचा सन साजरा करतात.
  • पवित्र शास्त्रामध्ये "खमीर" किंवा "किण्व" या शब्दांचा उपयोग लाक्षणिक अर्थाने, कसे पाप एखाद्या व्यक्तीच्या जीवनात पसरते किंवा कसे पाप इतर लोकांना प्रभावित करते ह्याचे चित्रण करण्यासाठी केला आहे.
  • ह्याचा संदर्भ चुकीच्या शिक्षणाशी सुद्धा आहे, जे सहसा अनेक लोकामध्ये पसरून त्यांना प्रभावित करत आहे.
  • "खमीर" हा शब्द, कसा देवाच्या राज्याचा प्रभाव एका मनुष्यापासून दुसऱ्या मनुष्यापर्यंत पसरत आहे, हे स्पष्ट करण्यासाठी, सकारात्मक मार्गांनी सुद्धा वापरला जाऊ शकतो.

भाषांतर सूचना

  • ह्याचे भाषांतर "खमीर" किंवा "कणिक फुगण्यास कारणीभूत असलेला पदार्थ" किंवा "फुगवणारे साधन" असे देखील केले जाऊ शकते. "वाढणे" या शब्दाचे भाषांतर "विस्तारणे" किंवा "मोठे होणे" किंवा "फुगणे" असे केले जाऊ शकते.
  • जर स्थानिक खामीराच्या साधनांचा वापर कणिक वाढवण्यासाठी केला जात असेल, तर ती संज्ञा वापरली जाऊ शकते. जर भाषेमध्ये एक सुप्रसिद्ध, सर्वसाधारण संज्ञा असेल जिचा अर्थ "खमीर" असा होतो, तर तो शब्द वापरण्यासाठी सर्वोत्तम असेल.

(हे सुद्धा पहा: मिसर, वल्हांडण, बेखमीर भाकरी)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: