mr_tw/bible/other/water.md

5.8 KiB

पाणी, पाण्याचा, पाणी घालणे, पाणी देणे (पाणी पाजणे)

व्याख्या:

त्याच्या प्राथमिक अर्थामध्ये भर म्हणून, "पाणी" ह्याचा सहसा संदर्भ पाण्याच्या आकारमानाशी आहे, जसे की, महासागर, समुद्र, तळे, किंवा नदी.

  • "पाण्याचा" हा शब्द म्हणजे पाणी किंवा अनेक स्त्रोत द्रव्यांचे शरीर. मोठ्या प्रमाणात पाण्याचा हा एक सामान्य संदर्भ देखील आहे.
  • "पाण्याचा" या शब्दाच्या उपयोगाच्या लाक्षणिक अर्थाच्या संदर्भामध्ये मोठे संकट, त्रास, आणि छळ यांचा समावेश आहे. उदाहरणार्थ, देवाने आपल्याला वचन दिले की, "जेंव्हा आपण पाण्यामधून जाऊ" तो आपल्याबरोबर असेल.
  • "अनेक पाणी" हा वाक्यांश, किती मोठी संकटे असतील ह्यावर भर देतो.
  • गुरेढोरे आणि इतर प्राण्यांना "पाणी देणे" ह्याचा अर्थ "त्यांना पाणी पुरवणे" असा होतो. पवित्र शास्त्राच्या काळात, या मध्ये सहसा पाणी बदलीच्या सहाय्याने विहिरीतून काढणे आणि ते पाणी द्रोण मध्ये किंवा इतर टाक्यात प्राण्यांना पिण्यासाठी ठेवणे ह्याचा समावेश होता.
  • जुन्या करारामध्ये, देवाला त्याच्या लोकांसाठी "जिवंत पाण्याचा" उगम किंवा झरा म्हणून संदर्भित केले आहे. ह्याचा अर्थ तो आत्मिक सामर्थ्याचा आणि ताजेतवानेपणाचा स्त्रोत आहे.
  • नवीन करारामध्ये, येशूने "जिवंत पाणी" या वाक्यांशाचा उपयोग, पवित्र आत्मा एका व्यक्तीच्या जीवनामध्ये त्याला बदलण्यासाठी आणि नवीन जीवन आणण्यासाठी काम करण्याच्या संदर्भात केला आहे.

भाषांतर सूचना

  • "पाणी काढणे" या वाक्यांशाचे भाषांतर "बादलीच्या सहाय्याने विहिरीतून पाणी ओढून काढणे" असे केले जाऊ शकते.
  • "त्यांच्यामधून जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील" ह्याचे भाषांतर "पवित्र आत्म्याचे सामर्थ्य आणि आशीर्वाद त्यांच्या मधून एखाद्या नदीच्या पाण्यासारखे वाहतील" असे केले जाऊ शकते. "आशीर्वाद" या शब्दाच्या जागी "वरदान" किंवा "फळ" किंवा "दैवी चारित्र्य" अशा शब्दांचा उपयोग केला जाऊ शकतो.
  • जेंव्हा येशू शोमरोनी स्त्रीशी विहिरीजवळ बोलत होता, "जिवंत पाणी" या वाक्यांशाचे भाषांतर "पाणी जे जीवन देते" किंवा "जीवन देणारे पाणी" असे केले जाऊ शकते. या संदर्भामध्ये, भाषांतरामध्ये पाण्याची प्रतिमा ठेवणे आवश्यक आहे.
  • संदर्भावर आधारित, "पाण्याचा" किंवा "अनेक पाणी" ह्याचे भाषांतर "मोठे संकट (जे तुला पाण्यासारखे घेरील)" किंवा "प्रचंड अडचणी (पाण्याच्या पुरासारख्या)" किंवा "मोठ्या प्रमाणातील पाणी" असे केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: आत्मा, पवित्र आत्मा, सामर्थ्य)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: