mr_tw/bible/other/walk.md

4.6 KiB

चालणे, चालले

व्याख्या:

"चालणे" हा शब्द बऱ्याचदा "जगणे" या लाक्षणिक अर्थाने वापरला जातो.

  • "हानोख देवाबरोबर चालला" म्हणजे हानोख देवाबरोबर घनिष्ट संबंधात राहीला.
  • "आत्म्याने चालणे" म्हणजे पवित्र आत्म्याद्वारे मार्गदर्शन होणे जेणेकरून आपण देवाला संतुष्ट आणि सन्मान देणारी कामे करावी.
  • देवाच्या आज्ञा किंवा देवाच्या मार्गाने "चालणे" म्हणजे त्याच्या आज्ञा "पाळत जगणे", म्हणजेच, "त्याच्या आज्ञा पाळणे" किंवा "त्याच्या इच्छेनुसार करणे"
  • जेव्हा देव म्हणतो की तो आपल्या लोकांमध्ये "चालेल", तेव्हा याचा अर्थ असा की तो त्यांच्यामध्ये राहत आहे किंवा त्यांच्याशी जवळून संवाद साधत आहे.
  • "विरुद्ध चालणे" म्हणजे एखाद्या गोष्टी किंवा एखाद्याच्या विरुद्ध असलेल्या मार्गाने जगणे किंवा वागणे.
  • "मागे चालणे" म्हणजे एखाद्याला किंवा एखाद्या गोष्टीला शोधणे किंवा त्याचा पाठपुरावा करणे. याचा अर्थ एखाद्या व्यक्तीप्रमाणेच वागणे असा देखील होऊ शकतो.

भाषांतरातली सूचना:

  • जोपर्यंत योग्य अर्थ समजला जाईल तोपर्यंत "चालणे" या संज्ञेचे शब्दशः भाषांतर करणे उत्तम आहे.
  • अन्यथा, "चालणे" या शब्दाचा अलंकारिक उपयोग "जगणे" किंवा "कृती करणे" किंवा "वागणे" या शब्दांद्वारे देखील अनुवादित केले जाऊ शकतात
  • "आत्म्याने चालणे" या वाक्यांशाचे भाषांतर "पवित्र आत्म्यास आज्ञाधारकपणे जगणे" किंवा "पवित्र आत्म्यास संतुष्ट करणाऱ्या मार्गाने वागणे" किंवा "जसा पवित्र आत्मा मार्गदर्शन करतो त्याप्रकारे देवाला प्रसन्न असलेल्या गोष्टी करा" असे केले जावू शकते.
  • "देवाच्या आज्ञेत चालणे" या वाक्यांशाचे भाषांतर "देवाच्या आज्ञेप्रमाणे जगणे" किंवा "देवाच्या आज्ञा पाळणे” असे केले जावू शकते.

"देवाबरोबर चालणे" या वाक्यांशाचे भाषांतर "देवाचे आज्ञा पालन करून आणि त्याचा आदर करून त्याच्याशी जवळच्या नात्यात जगणे"

(हे देखील पाहा: [पवित्र आत्मा], [सन्मान])

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

  • [1 योहान 01:07]
  • [1 राजे 02:04]
  • [कलस्सैकरांस पत्र 02:07]
  • [गलतीकरांस पत्र 05:25]
  • [उत्पत्ति 17:01]
  • [यशया 02:05]
  • [यिर्मया 13:10]
  • [मीखा 04:02]

शब्द संख्या:

  • स्ट्रॉन्गचे: एच 1869, एच 1980, एच 1981, एच 3212, एच 4108, जी 1704, जी 4043, जी 4198, जी 4748