mr_tw/bible/other/veil.md

3.5 KiB

आच्छादन, घुंघट, अच्छादली, आच्छादन नसलेला

व्याख्या:

"आच्छादन" या शब्दाचा सामान्यतः संदर्भ कापडाच्या पातळ तुकड्याशी आहे, ज्याचा उपयोग डोके झाकण्यासाठी, डोके किंवा चेहरा झाकण्यासाठी जेणेकरून ते दिसणार नाहीत.

  • मोशे देवाच्या उपस्थितीमध्ये राहून आल्यानंतर मोशेने त्याचा चेहरा अच्छादनाने झाकला, जेणेकरून त्याच्या चेहऱ्याचा तेजस्वीपणा लोकांच्यापासून लपून राहील.
  • पवित्र शास्त्रामध्ये, जेंव्हा स्त्री सार्वजनिक ठिकाणी किंवा पुरुषांच्या उपस्थितीत असायची तेंव्हा, ती तिचे डोके आणि सहसा चेहरासुद्धा झाकण्यासाठी घुंगटचा उपयोग करत असे.
  • "आच्छादन" या क्रियापदाचा अर्थ अछादनाने काहीतरी झाकणे असा होतो.
  • काही इंग्रजी आवृत्त्यांमध्ये, "आच्छादन" या शब्दाचा उपयोग जाड पडद्याला संदर्भित करण्यासाठी केला जातो, ज्याने अतिपवित्र स्थानाच्या प्रवेशद्वाराला झाकले होते. पण त्या संदर्भात "पडदा" हा शब्द अधिक योग्य आहे, कारण त्याचा संदर्भ जड, जाड कापडाच्या तुकड्याशी येतो.

भाषांतर सूचना

  • "आच्छादन" या शब्दाचे भाषांतर "पातळ कापडाचे आच्छादन" किंवा "कापडाचे आच्छादन" किंवा "डोक्याचे आच्छादन" असे केले जाऊ शकते.
  • काही संस्कृतीमध्ये, स्त्रियांच्या आच्छादनासाठी पूर्वीपासून एखादा शब्द अस्तित्वात आहे. जेंव्हा मोशेसाठी या शब्दाचा उपयोग केला जातो, तेंव्हा त्यासाठी वेगळा शब्द शोधला पाहिजे.

(हे सुद्धा पहा: मोशे)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: